मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा

Weather Updates: विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा

Jun 21, 2024 07:07 AM IST

Maharashtra Rain: विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता
राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता (फोटो - पीटीआय)

Maharashtra Weather Updates News: राज्यात गुरुवारी ठाणे, पालघर, विरार आणि कल्याण- डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस झाला. कल्याण- डोंबिवली येथील २०० ते २५० घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आज (शुक्रवार,२१ जून) विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.याशिवाय, शनिवारी देखील मध्य महाराष्ट्रात पावसाच जोर कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यात ढगाळ हवामान होत असून हलक्या सरी सुखावून जात आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागातील नागरिकांना अजूनही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी जळगावमध्ये राज्यातील उच्चांकी तापमान ३८.७ अंश तापमानाची नोंद झाली.

गेल्या २४ तासांत कोणत्या भागांत किती पाऊस?

कोकण: पालघर- १३० मिलीमीटर, कर्जत- ११० मिलीमीटर, डहाणू- १० मिलीमीटर, वाकवली- १० मिलीमीटर, विक्रमगड- ८० मिलीमीटर, गुहागर- ८० मिलीमीटर, अलिबाग- ७० मिलीमीटर, पेण- ७० मिलीमीटर, दापोली- ७० मिलीमीटर, खेड- ७० मिलीमीटर, श्रीवर्धन- ७० मिलीमीटर, तळा- ७० मिलीमीटर, सुधागड- ६० मिलीमीटर, भिवंडी- ६० मिलीमीटर, म्हसळा- ६० मिलीमीटर, जव्हार- ६० मिलीमीटर, वसई- ६० मिलीमीटर , चिपळूण- ५० मिलीमीटर, मुरूड- ५० मिलीमीटर, माथेरान- ५० मिलीमीटर, खालापूर- ५० मिलीमीटर, संगमेश्वर ५० मिलीमीटर, वाडा- ५० मिलीमीटर, रोहा- ४० मिलीमीटर, ठाणे- ३० मिलीमीटर, मुखेडा- ३० मिलीमीटर, तलासरी- ३० मिलीमीटर, मुरबाड- ३० मिलीमीटर, कुलाबा- ३० मिलीमीटर, सावर्डे- ३० मिलीमीटर, उरण- ३० मिलीमीटर, माणगाव- ३० मिलीमीटर.

मध्य महाराष्ट्र: महाबळेश्वर- ३० मिलीमीटर, धुळे- ३० मिलीमीटर, ओझरखेडा- २० मिलीमीटर, इगतपुरी- २० मिलीमीटर, शाहूवाडी- १० मिलीमीटर, गगनवबावडा- १० मिलीमीटर, वेल्हे- १० मिलीमीटर, नाशिक- १० मिलीमीटर, बार्शी- १० मिलीमीटर, त्र्यंबकेश्वर- १० मिलीमीटर.

मराठवाडा: मंथा- १० मिलीमीटर, धाराशिव- १० मिलीमीटर, नायगाव खैरगाव- १० मिलीमीटर.

विदर्भ: भामरागड- ३० मिलीमीटर, देवरी- ३० मिलीमीटर, भंडारा- ३० मिलीमीटर, आरमोरी- २० मिलीमीटर, ब्रह्मपूरी- २० मिलीमीटर, चंद्रपूर- २० मिलीमीटर, अर्जुनीमोरगाव- २० मिलीमीटर, तिरोडा- २० मिलीमीटर.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर