Weather News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. राज्यात येत्या चार दिवसांत तापमानात घट होणार असून थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. भारतीय हवामान विभाग पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांनी थांबवल्याने अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. आता कमी दाबाचा हा पट्टा ओसरला असून कोरडे वारे राज्यभर वाहणार आहेत.
पुणे- ३१.९ अंश सेल्सिअस, जळगाव- ३४.२ अंश सेल्सिअस, कोल्हापूर- ३३.५ अंश सेल्सिअस, महाबळेश्वर- २६.६ अंश सेल्सिअस, मालेगाव- ३३.२ अंश सेल्सिअस, नाशिक- ३०.० अंश सेल्सिअस, निफाड- ३२.० अंश सेल्सिअस, सांगली- ३२.६ अंश सेल्सिअस, सातारा- ३२.६ अंश सेल्सिअस, सोलापूर- ३३.२ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ- ३२.९ अंश सेल्सिअस, डहाणू- ३३.० अंश सेल्सिअस, रत्नागिरी- ३२.० अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर- ३३.० अंश सेल्सिअस, बीड- ३२.६ अंश सेल्सिअस, परभणी- ३४.४ अंश सेल्सिअस, अकोला- ३५.८ अंश सेल्सिअस, अमरावती- ३४.४ अंश सेल्सिअस, भंडारा- २८.० अंश सेल्सिअस, बुलडाणा- ३०.६ अंश सेल्सिअस, ब्रहापुरी- ३६.० अंश सेल्सिअस, चंद्रपूर- ३६.० अंश सेल्सिअस, गडचिरोली- ३५.० अंश सेल्सिअस, गोंदिया- ३४.५ अंश सेल्सिअस, नागपूर- ३५.६ अंश सेल्सिअस, वर्धा- ३५.० अंश सेल्सिअस, वाशीम- ३४.० अंश सेल्सिअस, यवतमाळ- ३४.० अंश सेल्सिअस.
संबंधित बातम्या