मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यात उन्हाचा चटका कायम, अनेक भागात तापमानाचा पारा ४२ अंशावर!

Weather Updates: राज्यात उन्हाचा चटका कायम, अनेक भागात तापमानाचा पारा ४२ अंशावर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 04, 2024 09:11 AM IST

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात कोणत्या भागात तापमानाचा पारा वाढला आहे आणि कुठे पावसाची शक्यता आहे, हे जाणून घेऊयात.

महाराष्ट्रातील तापमान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.
महाराष्ट्रातील तापमान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.

Maharashtra Temperature Today: राज्यात आता उकाडा वाढू लागला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. कोरड्या हवामानामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी. राज्यात उद्यापासून पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात सध्या निरभ्र आकाश आहे. नागरिकांना दिवसा उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. काळपासूनच उन्हाचा चटका वाढत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. बह्मपुरी, मध्य महाराष्ट्रातील जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे पारा ४२ अंशांच्या वर गेला आहे. बुधवारी (३ एप्रिल २०२४) ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, २८ दिवसात २३ जणांना उष्माघाताचा फटका

 

मुंबईतील तापमान

मुंबई शहर आणि उपनगरांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईतील उपनगरात किमान तापमान २३ सेल्सिअस आणि कमाल तापमान ३४ सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? पुढील दोन दिवस 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

 

पुढील आठवड्यापासून तापमान वाढ

देशातील अनेक भागात पुढील आठवड्यापासून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आजपासून येत्या ७ एप्रिलपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थितीची शक्यता आहे. तसेच उत्तर पश्चिम, मध्य भारत, आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बरसणार

 

बुधवारी कोणत्या जिल्ह्यात किती तापमान होते?

पुणे (३९.८), अहमदनगर (३८.९), धुळे (४०.०), जळगाव (४०.२), जेऊर (४२.०), कोल्हापूर (३८.६), महाबळेश्वर (३३.१), मालेगाव (४२.०), नाशिक (३८.२), निफाड (३७.८), सांगली (४०.५), सातारा (३९.२), सोलापूर (४२.०), सांताक्रूझ (३२.९), डहाणू (३३.६), रत्नागिरी (३२.७), छत्रपती संभाजीनगर (३८.६), बीड (४०.७), नांदेड (४०.२), परभणी (४०.५), अकोला (४१.८), अमरावती (४०.८), बुलडाणा (३८.०), ब्रह्मपुरी (४२.३), चंद्रपूर (४१.२), गडचिरोली (४०.६), गोंदिया (३९.८), नागपूर (४१.२), वर्धा (४१.५), वाशीम (४१.४), यवतमाळ (४१.२).

IPL_Entry_Point