Weather News: महाराष्ट्रातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ- उतार पाहायला मिळत आहे. या बदलांमुळे संपूर्ण देशात हवामान अस्थिर झाले आहे. उष्णतेच्या मिश्रणामुळे नागरिकांना विविध परिस्थितींना सामोरे जावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात येत्या दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, आज मुंबईतील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसचा आकडा गाठेल, असा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थान आणि त्यालगत मध्य पाकिस्तान भागात सध्या चक्राकारर वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय झाला आहे. तर, पुढे पश्चिमी चक्रावात वायव्येस राहणार आहे. यामुळे राज्यात येत्या दोन दिवसांत तापमानात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. राज्यातून थंडी गायब झाली असून आता अनेक भागात उन्हाचा पारा वाढला आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेतल्यानंतर आता नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
मुंबईमधील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ८ फेब्रुवारीला मुंबईतील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश राहणार अशून काही दिवस तापमान स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या