Maharashtra Weather Updates: राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसापासून चढ उतार होताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी प्रचंड गारठा आणि दुपारी तीव्र उन्हाचा चटका जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची वर्तवली आहे.
मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती निवळून गेल्या आहेत. वायव्य भारतात १२५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावातांमुळे थंडी कमी-अधिक होत आहे. राज्यात आज आकाश निरभ्र आकाशासह किमाना तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, आसाम, मेघालय आणि पूर्व राजस्थानमध्ये दाट धुक्यामुळे पावसाच्या सरी होऊ शकतात.
पुणे- ३३.२- १४.२, अहिल्यानगर- ३२.८ -१२.५, धुळे - २९.५-१०.५, जळगाव- ३१.४- १४.४, जेऊर -३४.५-१२.५, कोल्हापूर- ३२.२ -१९.२, महाबळेश्वर-२९.१-१७.०, मालेगाव-२९.२-१४.८, मालेगाव-२९.२-१४.८, नाशिक-३१.२-१३.४, निफाड-३०.२-१०.४, सांगली-३४.१-१७.२, सातारा-३३.२-१५.१, सोलापूर-३५.६-१८.६, सांताक्रूझ-३१.५-१७.१, डहाणू-२७.४-१७.०, रत्नागिरी-३३.४-१९.२, छत्रपती संभाजीनगर-३२.४-१५.८, धाराशिव-३१.८-१४.४, परभणी-३३.४-१४.५, परभणी (कृषी)-३२.१-११.६, अकोला-३४.१-१५.८, अमरावती-३३.०-१४.६, भंडारा-३०-१५, बुलडाणा-३२-१७, ब्रह्मपुरी-३५.३-१४, चंद्रपूर-३२-निरंक, गडचिरोली-३२-१४, गोंदिया-३१.४-१६.४
संबंधित बातम्या