Maharashtra Weather Updates: राज्यात थंडी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Updates: राज्यात थंडी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather Updates: राज्यात थंडी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

Jan 12, 2025 06:30 AM IST

Maharashtra Weather Updates Today: महाराष्ट्रातील तापमान गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.;

राज्यात थंडी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता
राज्यात थंडी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता (HT_PRINT)

Maharashtra Weather News: राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक भागांत १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली. तर, मुंबई, ठाणे, उपनगर आणि पुण्यात धुक्याची चादर आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर पाहायला मिळणार असला तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून ईशान्य अरबी समुद्रामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे. दरम्यान, कडाक्याची थंडी पडली असताना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर, धुळे, नाशिक, निफाड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणीसह महाराष्ट्राच्या इतर भागात तापमानाचा पारा १० अंशापर्यंत खाली आला आहे. येत्या काही दिवसात तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होईल. तर, विदर्भात पुढील चार दिवस वातावरण कोरडच राहिल, असा अंदाज आहे. तर इतर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे.

देशातील तापमान

उत्तर पश्चिम भारतात पुढचे तीन दिवस सर्वात कमी तापमान असणार आहे.भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाचा अंदाज तर उत्तरेकडे पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी असे दोन्ही वातावरण पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर