Weather Updates: राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात किमान तापमानात वाढ होत असून थंडी कमी झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट दूर होण्याची चिन्हे असून तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे.
पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. राज्यात अवकाळी पावसाचे सावट दूर होणार असले तरी राज्यात आज ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. तर, अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. बहुतेक ठिकाणी पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.तसेच राज्यात पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे- २८१ (१७.३), अहिल्यानगर- २७.९ (१७.५), धुळे- ३२ (१६.४), जळगाव- ३०.२ (१९.८), जेऊर- २९.५ (१५.५), कोल्हापूर- २८.७ (२०), महाबळेश्वर- २४.१ (१६), मालेगाव- (२०), नाशिक- ३०.९ (१८.५), निफाड- २८८ (१७.८), सांगली- (१९.१), सातारा- (१९.८), सोलापूर- २८.८ (२१.१), सांताक्रूझ- ३०.८ (२१), डहाणू- २७.८ (१९.५), रत्नागिरी- ३३ (२२.६), छत्रपती संभाजीनगर- २८.६ (१८.४), धाराशिव- २७.८ (१७.३), परभणी - (१७.९), परभणी कृषी विद्यापीठ- २९.७ (१६.१), अकोला- २६.७ (१९.१), अमरावती- २८.४ (१९.२), भंडारा- ३०.६ (२२), बुलडाणा- २९ (१८.८), ब्रह्मपुरी- ३३.९ (२०.२), चंद्रपूर- ३० (-), गडचिरोली- २९ (१८.६), गोंदिया- ३०.६ (२०.६), नागपूर- २९.६ (१९.१), वर्धा- ३०.२ (१९), वाशीम- ३०.२ (१८.६), यवतमाळ- २९.५ (-).
उत्तर भारतात २९ डिसेंबरपासून थंडीची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. पाकिस्तानजवळील पश्चिम विक्षोभामुळे पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातील किमान तापमानात ३ ते ५ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. २९ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत हिमाचल प्रदेशातील तुरळक भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. ३० आणि ३१ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशच्या काही भागात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरयाणामध्ये २९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये २८ आणि २९ डिसेंबरला थंडीचे दिवस येतील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
संबंधित बातम्या