Weather Updates: राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा

Weather Updates: राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा

Jan 26, 2025 07:35 AM IST

Maharashtra Weather Updates Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडणार असून नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा
राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा (HT_PRINT)

Weather News: महाराष्ट्रातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसचे नागरिकांनी aया काळात आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या काही दिवसांत किमान राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा गारठ्याचा सामना करावा लागणार आहे. राज्यात पुढील पाच दिवस कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडील नैऋत्य मौसमी पावसाचं वातावरण आता येत्या दोन दिवसात कमी होणार आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागापासून राजस्थान ते गुजरात पर्यंत हवेचा दाब राहणार आहे. कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येत्या पाच ते सहा दिवसात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होणार आहे. मात्र, काही भागात उकाड्याचाही सामना करावा लागेल.

२५ जानेवारी रोजी राज्यात तापमान किती होते?

धुळे - १०.५ सेल्सिअस, निफाड - ११.३ सेल्सिअस, परभणी (कृषी)- १२.९ सेल्सिअस, धाराशिव - १३.४ सेल्सिअस, जळगाव - १४ सेल्सिअस, नाशिक - १४.८ सेल्सिअस, नाशिक - १४.८ सेल्सिअस, अहिल्यानगर - १४.७ सेल्सिअस, पुणे - १५.५ सेल्सिअस, नागपूर - १५.५ सेल्सिअस, ब्रह्मपुरी - १५.२ सेल्सिअस, वर्धा - १५.२ सेल्सिअस, गडचिरोली- १५ सेल्सिअस, गोंदिया - १५.८ सेल्सिअस, भंडारा - १५ सेल्सिअस , परभणी - १५.३ सेल्सिअस, सातारा - १५.५ सेल्सिअस, अमरावती - १६.१ सेल्सिअस, सांगली - १६.३ सेल्सिअस, बुलढाणा - १६.४ सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर - १६.४ सेल्सिअस , मालेगाव - १६ सेल्सिअस , सोलापूर - १८.१ सेल्सिअस, कोल्हापूर - १८.१ सेल्सिअस , डहाणू - १८.९ सेल्सिअस, वाशिम - १९.६ सेल्सिअस, यवतमाळ - १८ सेल्सिअस, सांताक्रूझ - २०.२ सेल्सिअस , रत्नागिरी - २०.६ सेल्सिअस , महाबळेश्वर - १७.४ सेल्सिअस.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर