Weather Updates: मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता

Weather Updates: मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता

May 23, 2024 07:20 AM IST

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उष्णतेची लाट येणार आणि कुठे पावसाच्या सरी कोसळणार, हे जाणून घेऊयात.

महाराष्ट्रातील अनेक भागांतील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांतील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

Weather News: महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांतील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने जमी अक्षरश: होरपळून निघत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर, राज्यातील तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

देशांत बुधवारी हरियाणातील सिरसा येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाराष्ट्रात जळगावमध्ये ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावा लागत आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला येथे उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ येथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. राज्यात जळगाव, धुळे, अकोला, ब्रह्मपुरी, अमरावती आणि वर्धा येथे ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रात बुधवारी नोंदवण्यात आलेले तापमान

पुणे (४०.६ अंश सेल्सिअस), धुळे (४४.५ अंश सेल्सिअस), जळगाव (४५.२ अंश सेल्सिअस), कोल्हापूर (३६.२ अंश सेल्सिअस), महाबळेश्वर (३०.९ अंश सेल्सिअस), नाशिक (४१.८ अंश सेल्सिअस), निफाड (४२ अंश सेल्सिअस), सांगली (३६.४ अंश सेल्सिअस), सातारा (३८.४ अंश सेल्सिअस), सोलापूर (४१.८ अंश सेल्सिअस), सांताक्रूझ (३४.९ अंश सेल्सिअस), डहाणू (३६.७ अंश सेल्सिअस), रत्नागिरी (३२.८ अंश सेल्सिअस), छत्रपती संभाजीनगर (४१.६ अंश सेल्सिअस), नांदेड (४०.८ अंश सेल्सिअस), धाराशिव (४०.५ अंश सेल्सिअस), परभणी (४१.७ अंश सेल्सिअस), अकोला (४४ अंश सेल्सिअस), अमरावती (४३.२ अंश सेल्सिअस), भंडारा (४०.१ अंश सेल्सिअस), बुलडाणा (४१.३ अंश सेल्सिअस), ब्रह्मपुरी (४३.३ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (४२.८ अंश सेल्सिअस), गडचिरोली (४१.४ अंश सेल्सिअस), गोंदिया (३९.६ अंश सेल्सिअस), नागपूर (४०.७ अंश सेल्सिअस), वर्धा (४३.१ अंश सेल्सिअस), वाशीम (३९.२ अंश सेल्सिअस), यवतमाळ (४२ अंश सेल्सिअस).

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर