Todays Weather Update: महाराष्ट्रातील तापमाना वाढ होऊ लागली असून राज्यातील अनेक भागात थंडी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळी कडक ऊन पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात कडक ऊन असेल. मात्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात ज्याप्रमाणे थंडी जोर पाहायला मिळाला, आता त्याचप्रमाणे उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सोलापुरात शनिवारी राज्यातील सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील अनेक भागात कमाल तापमानातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक भागात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २२ फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. हरियाणाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावर ६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दक्षिण गुजरात, कोकण गोवा ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राजधानी दिल्लीत १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतील कमाल तापमान २४ ते २७ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.सिक्कीम आणि ईशान्य भारतातही हलक्या पावसाची शक्यता आहे.