Weather News: यंदा राज्यात मान्सून नियोजित वेळेपूर्वीच सक्रिय झाला आहे. मात्र, यानंतरही अनेक राज्ये पावसासाठी आसुसलेली आहेत. तर, अनेक राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने विदर्भात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, येत्या ६ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामाने विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. याशिवाय, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असेही सांगण्यात आले. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर (आजरा १११ मिलीमीटर, चंदगड ६८ मिलीमीटर, गगनबावडा ८८ मिलीमीटर, गारगोटी ४० मिलीमीटर, कागल २७ मिलीमीटर, पन्हाळा ४३ मिलीमीटर, शाहूवाडी ८० मिलीमीटर), नाशिक (इगतपुरी ३२ मिलीमीटर, त्र्यंबकेश्वर २१ मिलीमीटर), पुणे (भोर २२ मिलीमीटर, पौड ५३ मिलीमीटर, शिरूर २० मिलीमीटर, वेल्हे ५४ मिलीमीटर), सांगली (कोकरूड ५३ मिलीमीटर, शिराळा २४ मिलीमीटर), सातारा (महाबळेश्वर ३९ मिलीमीटर, पाटण ७२ मिलीमीटर, सातारा ५६ मिलीमीटर) आणि सोलापूर २५ मिलीमीटर.
बीड (केज २० मिलीमीटर, पाटोदा २३ मिलीमीटर), धाराशिव (लोहारा ४४ मिलीमीटर, तुळजापूर ४७ मिलीमीटर, उमरगा २० मिलीमीटर), लातूर (अहमदपूर २१ मिलीमीटर, रेणापूर २५ मिलीमीटर), परभणी (पालम ३५ मिलीमीटर, सोनपेठ ४७ मिलीमीटर) आणि नांदेड (किनवट २५ मिलीमीटर)
चंद्रपूर (सिंदेवाही २६ मिलीमीटर), गडचिरोली (अहेरी ३० मिलीमीटर, भामरागड २३ मिलीमीटर, देसाईगंज वडसा ७३ मिलीमीटर, कोरची २९ मिलीमीटर, कुरखेडा ३७ मिलीमीटर, सिरोंचा २८ मिलीमीटर) आणि वर्धा (हिंगणघाट २१ मिलीमीटर)
संबंधित बातम्या