मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: कोकणच्या तापमानात वाढ; मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा

Weather Updates: कोकणच्या तापमानात वाढ; मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 28, 2024 06:46 AM IST

Maharashtra Temperature: महाराष्ट्रात कोणत्या भागात उष्णता वाढणार आणि कुठे पावसाच्या सरी कोसळणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज.

मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (PTI)

Weather News: राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळाले. आज कोकणच्या तापमानात (Konkan Temperature) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तर, बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.

Onion Export: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात शनिवारी नोंदवलेले तापमान

महाराष्ट्रात शनिवारी (२७ एप्रिल २०२४) चंद्रपूर (४३.६) येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तर, पुणे (४०.३ सेल्सिअस), धुळे (४१.५ सेल्सिअस), जळगाव (४०.६ सेल्सिअस), कोल्हापूर (३८.५ सेल्सिअस), महाबळेश्वर (३२.५ सेल्सिअस), मालेगाव (४१.० सेल्सिअस), नाशिक (३७.६ सेल्सिअस), निफाड (३७.६ सेल्सिअस), सांगली (३९.६ सेल्सिअस), सातारा (३८.२ सेल्सिअस), सोलापूर (४१.२ सेल्सिअस), सांताक्रूझ (३५.५ सेल्सिअस), डहाणू (३३.९ सेल्सिअस), रत्नागिरी (३३.२ सेल्सअस) छत्रपती संभाजीनगर (३९.६ सेल्सिअस), बीड (४१.८ सेल्सिअस), नांदेड (४१.२ सेल्सिअस), परभणी (४२.२ सेल्सिअस), अकोला (४१.९ सेल्सिअस), अमरावती (४०.४ सेल्सिअस), बुलढाणा (४०.५ सेल्सिअस), ब्रह्मपूरी (४२.७ सेल्सिअस), गडचिरोली (४१.० सेल्सिअस), गोंदिया (३५.४ सेल्सिअस), नागपूर (३७.० सेल्सिअस), वर्धा (४२.५ सेल्सिअस), वाशीम (४२.४ सेल्सिअस) आणि यवतमाळ येथे ४१.२ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुढील चार दिवस वादळी पावसाचा अंदाज

हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला.

IPL_Entry_Point