मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात पुढील २४ तासात अवकाळी पावसाची शक्यता

Weather Updates: महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात पुढील २४ तासात अवकाळी पावसाची शक्यता

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 06, 2024 07:24 AM IST

Weather Updates Today: महाराष्ट्रासह भारतात कोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार आणि कुठे उन्हाचे चटके जाणवणार? वाचा

Maharashtra Weather Updates
Maharashtra Weather Updates

Weather Updates: देशातील बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. देशातील काही भागात थंडी आणि काही ठिकाणी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तर, बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासात महाराष्ट्रासह देशात अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

काश्मीर खोऱ्यासह पर्वतीय भागात पाऊस पडत आहे. ज्यामुळे उत्तर भारतात तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशात गडगडाटासह मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याता अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पुन्हा एकदा तापमानात घट नोंदवण्यात आली. राजधानी दिल्लीत मंगळवारी सकाळी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.याशिवाय, आजपासून पुढील २४ तास उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतातील अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये आज हलका पाऊस पडू शकतो.

WhatsApp channel