Maharashtra Weather News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतला. मान्सून परतल्यानंतरही राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर, उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरींसह उन्हाचा चटका जाणवू शकतो.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथे जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडू शकतो.याशिवाय, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे- ३२.८ सेल्सिअस, जळगाव- ३३.८ सेल्सिअस, कोल्हापूर- २९.१ सेल्सिअस, महाबळेश्वर- २५.९ सेल्सिअस, नाशिक- ३२.३ सेल्सिअस, निफाड- ३२.५ सेल्सिअस, सांगली- २९.५ सेल्सिअस, सातारा- ३०.५ सेल्सिअस, सोलापूर- ३३.४ सेल्सिअस, सांताक्रूझ- ३२.७ सेल्सिअस, डहाणू- ३३.३ सेल्सिअस, रत्नागिरी- ३१.६ सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर- ३३.२ सेल्सिअस, परभणी- ३२.६ सेल्सिअस, अकोला- ३६.५ सेल्सिअस, अमरावती- ३५.६ सेल्सिअस, भंडारा- ३२ सेल्सिअस, बुलडाणा- ३२.० सेल्सिअस, ब्रह्मपुरी- ३६.२ सेल्सिअस, चंद्रपूर- ३५.४ सेल्सिअस, गडचिरोली- ३३ सेल्सिअस, गोंदिया- ३३.८ सेल्सिअस, नागपूर- ३४.६ सेल्सिअस, वर्धा- ३४ सेल्सिअस, वाशीम- ३४.२ सेल्सिअस, यवतमाळ- ३३.५ सेल्सिअस.
संबंधित बातम्या