Weather Updates: राज्यात पावसाचा धुमाकूळ! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट-imd issue red alert for mumbai thane palghar raigad and ratnagiri ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: राज्यात पावसाचा धुमाकूळ! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट

Weather Updates: राज्यात पावसाचा धुमाकूळ! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट

Sep 26, 2024 10:00 AM IST

Maharashtra Rain : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट (Hindustan Times)

Weather News: पावसाळ्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईला झोडपून काढले. अनपेक्षित मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले. तसेच रेल्वे सेवा, रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीचा इशारा दिला आणि आपत्कालीन उपाययोजना केल्या. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहर आणि उपनगरातील सर्व सार्वजनिक शाळांना दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय हवामान शास्त्र विभागाने, आज मुंबईत सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडले, अशा इशारा दिला असून दिवसभरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. .तसेच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असतानाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन

आयएमडीने उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. सर्व मुंबईकरांनी अत्यावश्यक तोपर्यंत घरातच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कृपया सुरक्षित राहा,' असे मुंबई पोलिसांनी एक्सवर पोस्ट केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०० नंबर डायल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आणि उशीर झाला. अनेक भागात पूर आला असून शहराला पाणीपुरवठा करणारे सातपैकी दोन तलाव ओसंडून वाहत आहेत.या पावसामुळे मध्य रेल्वेवरील २८ लोकल फेऱ्या दुपारी १२.२० वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या. तर, गाड्या सरासरी ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी जावे. मुंबईकरांनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घरातच राहावे, असा सल्लाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तर,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

देशातील हवामान

पुढील काही दिवसांत उत्तर तामिळनाडूत विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. दमट हवा आणि उच्च तापमानामुळे तामिळनाडूतील तुरळक भागात उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुद्दुचेरी आणि कराईकलच्या तुरळक भागात उष्ण आणि अस्वस्थ हवामान राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

Whats_app_banner