Rahul Gandhi in INDIA alliance rally in Mumbai: मुंबईत रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्यावर देखील राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी म्हणाले, जेव्हा भाजप सरकार पाहिल्यांदा सत्तेत आले तेव्हा, भूसंपादन कायदा आणला. या कायद्या विरोधात जेव्हा मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला धमकी देण्यात आली. तेव्हाचे मंत्री अरुण जेटली यांनी मला या विरोधात बोलल्यास माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केला आहे.
मुंबईत शिवाजी पार्क येथे रविवारी इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली. या सभेत सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी जहरी टीका केली. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देखील भाजपवर टीका केली. यावेळी राहुल गांधी यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी त्यावेळेचे भाजप सरकारमधील मंत्री अरुण जेटली यांचावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, भाजप सरकार सत्तेत आले तेव्हा त्यांनी भू संपादन कायदा केला. हा कायदा शेतकाऱ्यांच्या हिताचा नसल्याने मी त्याविरोधात आवाज उठवला. मात्र, त्यावेळेचे मंत्री अरुण जेटली यांनी मला फोन करत भूसांपादन कायद्याविरोधात बोलू नका असे सांगितले. मात्र, हा कायदा शेतकऱ्यांचा हिताचा नसल्याने मी यावर बोलणारच अशी भूमिका मी घेतली. मात्र, जेटली यांनी माझ्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी मला दिली.
राहुल गांधी म्हणाले, माझ्यावर जेवढे खटले दाखल करायचे असेल तेवढे दाखल करा. मी कुणालाही घाबरत नाही. माझ्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी मला ५० तास बसवून ठेवले. या नंतर ईडीच्या अधिकारी म्हहणाला, की तुम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नाहीत. तुम्ही त्यांना हरवू शकता. आज मी येथे राहुल गांधी म्हणून नाही तर या देशाच्या आवाज म्हणून आम्ही येथे बोलत आहोत. या ठिकाणी आम्ही जमलेले घाबरलेलो नाही. या यंत्रणेनेविरुद्ध आम्ही आवाज उठवत आहोत. मोदी यांच्या कडे आज भराष्ट्राचाराची ताकद आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही, असे देखील राहुल गांधी म्हणाले.