Mankaja Munde : ‘पंकजाताई निवडून न आल्यास..’; व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mankaja Munde : ‘पंकजाताई निवडून न आल्यास..’; व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Mankaja Munde : ‘पंकजाताई निवडून न आल्यास..’; व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Jun 08, 2024 11:20 PM IST

pankaja munde News : बीड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे जर निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला,असा व्हिडिओ त्याने व्हायरल केला होता. आता त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पंकजाताई निवडूनआल्या नाही तरसचिन गेला...’ असा व्हिडिओ सर्व सोशल माध्यमांवर व्हायरल करणाऱ्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. सचिन मुंडे (३८, रा. येस्तार, ता. अहमदपूर) असे या मृत तरुणाचे नाव असून तो ट्रकचालक म्हणून काम करत होता. अहमदपूर-अंधोरी रोडवरील बोरगाव पाटीनजीक शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बीड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे जर निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला, असा व्हिडिओ त्याने व्हायरल केला होता. आता त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याने आत्महत्या केल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर मी आत्महत्या करेन, असे व्हिडिओ सचिनेने लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी व्हायरल केले होते.

राज्यात सर्वाधिक चुरशीने लढल्या गेलेल्या बीड लोकसभा  मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. या मतदारसंघात मतमोजणीवेळी तणावाचे वातावरण होते. शरद पवार यांनीही ट्विट करून पोलिस महासंचालकांनी बीडमधील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवावी, येथे कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते असे म्हटले होते. बीडमधील वातावरण अजूनही निवळलेलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अहमदपूर तालुक्यातील येस्तार गावात राहणारा सचिन मुंडे हा ट्रकचालक होता. तो अविवाहित होता. ट्रकचालवून तोआई-वडील आणि भावाचा उदरनिर्वाह चालवत होता. लोकसभा निकालाच्या काही दिवस आधीपासून ‘पंकजाताई नाही जर आल्या... तर सचिन गेला...’ अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरलहोत होते. शुक्रवारी रात्री त्याचा मृतदेह आढळून आला. सचिनचे व्हिडिओ अहमदपूर तालुक्यातील सर्व व्हॉटस्ॲप ग्रुप आणिअन्य सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर इथून येलदरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एसटी महामंडळाची बस बोरगाव पाटीवर थांबली होती. प्रवासी चढल्यानंतर बस पुढे निघाली. त्यावेळी तीव्र वळणावर चालकाला दिसले की, एक इसम रस्त्यात पडला आहे.

 

चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र बसचे मागचे चाक त्याच्या अंगावरून गेले. यामध्ये सचिनचा मृत्यू झाला. सचिनच्या मृतदेहावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर