मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : अजित पवार भाजपात आल्यास त्यांचं स्वागत करू; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar : अजित पवार भाजपात आल्यास त्यांचं स्वागत करू; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 17, 2023 04:51 PM IST

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Chandrasekhar Bawankule On Ajit Pawar
Chandrasekhar Bawankule On Ajit Pawar (HT_PRINT)

Chandrasekhar Bawankule On Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिग्री प्रकरण तसेच गौतम अदानी यांच्या चौकशीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचे कान टोचल्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समर्थक आमदारांचा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास तयार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याशिवाय आठ एप्रिल रोजी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेत खातेवाटपावर चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळं आता अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या वृत्तांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेनुसार काम करणार असतील तर कुणीही भाजपात आलं तर आम्हाला हरकत नाहीये. भाजपमध्ये सर्वांना स्थान देण्यात येईल. देव, देश आणि धर्माला मानणाऱ्या लोकांनी भाजपात प्रवेश केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर अजित पवार आणि भाजपात काही ठरलेलं आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Aarey Forest : आरे कॉलनीतील १७७ झाडं तोडण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी, शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा

अजित पवारांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द...

नागपुरच्या दौऱ्याहून परतलेले अजित पवार पुणे शहर तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यक्रम रद्द करत मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. सासवडमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. परंतु त्यांनी सभेत भाषण केलं नव्हतं. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

IPL_Entry_Point