मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Political Crisis : “बंडखोरांमुळे राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं तर..”

Political Crisis : “बंडखोरांमुळे राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं तर..”

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 27, 2022 05:24 PM IST

बंडखोरांमुळे मनसेलापर्यायाने राज ठाकरेना मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बंडखोर मनसेत प्रवेश करणार?
बंडखोर मनसेत प्रवेश करणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात दररोज नवनवी समीकरणे निर्माण होताना दिसत आहेत. शिवसेनेतील बंडखोरएकनाथ शिंदे गटाला आता कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा पर्याय आहे.शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटातील ३९ आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशीही या मुद्द्यावर फोनवर चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल्याचे बोलले जात असले तरी,यामागचे खरे कारण शिंदे गटाला मनसेत प्रवेश करून राज्यातील राजकारणाची नवी समीकरणे निर्माण करायची असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

बंडखोर आमदार एमआयएम,समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, मोठेकेले, त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेलापर्यायाने राज ठाकरेना मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान,एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी फोन केला. रविवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटं प्रकृती संदर्भातील चर्चा झाली. राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचं त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचे समजते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या