मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shambhuraj Desai: शिंदे सरकारचा मद्यपींना दणका! गोव्याहून एकही दारूची बाटली आणल्यास लागणार मोक्का

Shambhuraj Desai: शिंदे सरकारचा मद्यपींना दणका! गोव्याहून एकही दारूची बाटली आणल्यास लागणार मोक्का

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 03, 2022 02:27 PM IST

Shambhuraj Desai : शिंदे सरकारने मद्यपींना चांगलाच दणका दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी एक फतवा काढला असून जर गोव्यावरून विनापरवाना एक देखील मद्याची बाटली आणल्यास त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

गोव्यावरून एक जरी दारूची बाटली आणल्यास लागणार मोक्का
गोव्यावरून एक जरी दारूची बाटली आणल्यास लागणार मोक्का

मुंबई: गोव्याला मौजमजेसाठी साठी जाऊन परत येत असतांना अनेक मद्यप्रेमी हे छुप्या पद्धतीने दारूच्या बाटल्या या राज्यात आणत असतात. गोव्यात दारूवरील टॅक्स कमी असल्याने देखील राज्यात याची तस्करी केली जाते. यामुळे ही तस्करी थांबवण्यासाठी आता शिंदे सरकारने कठोर पावले उचलली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी एक फतवा काढला असून जर गोव्यावरून विनापरवाना एक देखील मद्याची बाटली आणल्यास त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देसाई यांनी दिल्या आहेत.

गोव्यावरून मोठ्या प्रमाणात स्वत: दारू आणून ती बेकायदेशीर रित्या राज्यात विक्री केली जात होती. याचा परिणाम राज्याच्या महासुलावर होत होता. यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. काही नागरिक हे गोव्यातून मद्याच्या दुकानातून परवाना घेऊन राज्यात दारूघेऊन येत होते. मात्र, शंभूराज देसाई यांनी गोव्याला अशा प्रकारचा परवाना देण्याचा काही ही अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देसाई म्हणाले, यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावण्याचे आदेश देण्यात असल्याचे त्यांनी सांगतिले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात असा परवाना देण्याचा त्यांना अधिकार नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.

गोव्यावरून दारूची होणारी तस्करी थांबवण्यासाठी गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या अनेक छोट्या ते मोठ्या रस्त्यांवर चेकपॉइंट्स उभारण्याच्या देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे म्हणाले, गोव्याहून येणाऱ्या ज्या रस्त्यांवर तपासणी होत नाही त्या ठिकाणी देखील आता चेकपॉइंट बांधण्यात येणार आहे. सध्या वारंवार गुन्हा करणाऱ्यांविरोधात मोक्काच्या कलम ९३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग