Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या कुटुंबात कोणाचीही चारचाकी असेल तर योजनेतून नाव होणार बाद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या कुटुंबात कोणाचीही चारचाकी असेल तर योजनेतून नाव होणार बाद

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या कुटुंबात कोणाचीही चारचाकी असेल तर योजनेतून नाव होणार बाद

Published Feb 04, 2025 11:16 AM IST

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आता सर्वे होणार आहे. यात जर कुटुंबात कार आढळली तर या योजनेतून नाव बाद केले जाणार आहे.

कुटुंबात आढळली कार तर लाडकी बहीण योजनेतून होणार नाव बाद; पती, सासऱ्यांच्या घरी चारचाकी असली तरी लाभ रद्द
कुटुंबात आढळली कार तर लाडकी बहीण योजनेतून होणार नाव बाद; पती, सासऱ्यांच्या घरी चारचाकी असली तरी लाभ रद्द

Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणास लवकरच सुरूवयात होणार आहे. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करणार असून जर लाभार्थ्यांच्या घरात चारचाकी वाहन आढळले तर लाडकी बहीण योजनेतून त्यांचे नाव रद्द केले जाणार आहे. एवढेच नाही तर पती किंवा इतर कुटुंबियांकडे जरी कार आढळली तर त्यांचे नाव हे बाद केले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास कल्याण अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेत या सूचना दिल्या आहेत.

राज्यात तब्बल अडीच कोटी महिलांनी घेतला योजनेचा लाभ

राज्यात तब्बल अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये निकषानुसार पात्र नसलेल्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अपात्र लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आता घेत घरी जाऊन पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे अपात्र महिलांना या योनेतून बाद केले जाणार आहे.

स्वत:हून नाव मागे घेण्याचे केले होते आवाहन

या योजनेतून अपात्र महिलांनी स्वत:हून नावे मागे घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. स्वतःहून जर कोणी लाभ सोडण्यासाठी अर्ज करत असेल तर त्यांचा अर्ज वगळण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नावाने लॉगिन देखील दिले गेले होते. मात्र, काही मोजक्याच बहिणींनी त्यांची नावे या योजनेतून स्वत:हून मागे घेतली आहे.

महिला बाल कल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी राज्यातील सुमारे लाखभर अर्जाची अद्याप छाननी बाकी आहे. त्या अजाँची आज, मंगळवारी पूर्ण करावी. त्यातून कोणते अर्ज नाकारायचे किंवा कोणते अर्ज मंजूर करायचे याचा निर्णय घेण्याचे; तसेच त्याची यादी अंतिम करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

घरात कार असल्यास योजनेतून होणार नाव बाद

लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन असू नये, अशी योजनेची अट आहे. मात्र, अनेक महिलांनी या अटीकडे दुर्लक्ष करून अर्ज भरले आहेत. त्यामुळे या योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी अपात्र, महिलांची नावे वगळली जावीत यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महिला बालकल्याण विभागाने राज्य परिवहन विभागाकडून चारचाकी वाहनमालकांची यादी मिळवली असून त्यानुसार ही यादी प्रत्येक जिल्ह्यात पाठवली जाणार असून त्यानुसार अंगवडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चारचाकी कोणाच्या नावावर आहे याचे सर्वेक्षण करणार आहे.

पती, सासरे यांच्या नावावर कार असली तरी होणार लाभ रद्द

एकत्रित कुटुंबातील पती, सासरे यांच्यापैकी कोणाकडेही चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर त्या कुटुंबातील पत्नी अथवा सून किंवा सासू यांची नावे या योजनेतून वगळली जाणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर