Shrikar Pardeshi : आयएएस श्रीकर परदेशी यांची बदली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shrikar Pardeshi : आयएएस श्रीकर परदेशी यांची बदली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

Shrikar Pardeshi : आयएएस श्रीकर परदेशी यांची बदली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

Dec 06, 2024 10:45 PM IST

IAS Shrikar Pardeshi : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांच्या सचिवपदी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी हे२००१च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

श्रीकर परदेशी हे जून २०२१ मध्ये पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात परतले होते. तेव्हा त्यांच्याकडे सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची नियुक्ती करण्यात आली होती. २०२२ मध्ये महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा श्रीकर परदेशी यांची नियुक्ती फडणवीस यांच्या सचिवपदी करण्यात आली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र शिंदे-फडणवीस सरकार येताच त्यांना उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. परदेशी हे २००१ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून अनेक जिल्ह्यात काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांच्या कामाची भुरळ पडली. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना थेट राजधानी दिल्लीत पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आलं होतं.

कोण आहेत श्रीकर परदेशी?

२००१ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या डॉ. परदेशींनी जेथे नियुक्ती होईल तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील रहिवासी आहेत. श्रीकर पेशाने डॉक्टर होते. यांनी एमबीबीएस-एमडी शिक्षण पूर्णकेले असून काही काळ प्रॅक्टिसही केली आहे. २००१ साली यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्रातून पहिले येण्याची किमया केली होती. पिंपरी चिंचवड आयुक्तपदावर असताना २० मजली इमारतींचं अतिक्रमण त्यांनी जमीनदोस्त केलं,  तेव्हा नागरिकांनी त्यांना बुलडोझर मॅन अशी उपमा दिली होती. त्यांनी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा किताबही पटकावला आहे.

 

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कारकिर्द गाजली होती. यवतमाळ, कोल्हापूर,अकोला इथेही त्यांनी असेच काम केले. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. जलसंधारणावर त्यांचा मोठा अभ्यास आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर