प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने मनमानी आणि चमकोगिरी केल्यानंतर संपूर्ण देशात चर्चेत आली आहे. तिच्यावर होत असलेल्या आरोपानंतर तिची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. ३२ वर्षीय पूजा खेडकर २०२३ च्या बॅचची आयएएस अधिकारी असून तिला महाराष्ट्र केडर मिळाले आहे. मात्र भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय कोट्यातील लाभांचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) या प्रकरणाचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. त्याचबरोबर मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LSBNAA)ने खेडकर बाबतच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. अकादमीचा अंतिम अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवला जाणार आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या आहेत. परिविक्षा कालावधीतच त्या वादात अडकली आहे. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिविल सेवा परीक्षेवेळी पूजा खेडकरने दावा केला होता की, ती मानसिक दृष्ट्या दिव्यांग आहे तसेच तिला दृष्टीदोषही आहे. मात्र आश्चर्य म्हणजे कोणतीही तपासणी न करता तिची प्रशासकीय सेवेसाठी नियुक्ती झाली. यावरून आता वाद झाला आहे.
सिविल सेवा परीक्षेच्या वेळी पूजा खेडकरने प्रतीज्ञापत्रात म्हटले होते की, ती मानसिकदृष्ट्या दिव्यांग आहे तसेच तिला दृष्टीदोषही आहे. या कारणामुळे तिला अंतिम निवडीवेळी सवलत देण्यात आली व कमी गुण असूनही तिचे प्रशासकीय सेवेसाठी निवड करण्यात आली. वाद या गोष्टीवरून आहे की, पूजा खेडकरने मेडिकल तपासणीसाठी सहा वेळी विविध कारणे सांगून नकार दिला होता. मात्र त्यानंतरही तिची निवज झाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आयएएस पूजा खेडकरची मेडिकल टेस्ट २२ एप्रिल २०२२ रोजी नई दिल्लीतील एम्समध्ये होणार होती. मात्र कोरोनाचे कारण सागून पूजा या तरासणीसाठी गेली नाही. त्यानंतर त्याचवर्षी २६-२७ मे रोजी होणारी मेडिकल टेस्टसाठीही गेली नाही. तिने अनेक वेळी टेस्टसाठी नकार दिला. मात्र २२ ऑगस्ट रोजी त्यांची एक मेडिकल तपासणी झाली. मात्र २ सप्टेंबर रोजी पुन्हा तील एमआरआय तपासणीसाठी गेल्या नाहीत. पूजा खेडकर यांनी बाहेर एका केंद्रात एमआरआय करून त्याचा रिपोर्ट यूपीएससीला सादर करण्यात आला. मात्र हा रिपोर्ट केंद्रीय लोक सेवा आयोगाने अस्वीकार केला होता. यूपीएससीने पूजा खेडकरच्या नियुक्तीला सेंट्रल अडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलमध्ये आव्हान दिले. मात्र अखेर पूजा खेडकरची निवड झाली.
ओबीसी प्रमाणपत्रावरही प्रश्नचिन्ह -
आरटीआय कार्यकर्ता विजय कुंभार यांनी दावा केला आहे की, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरही माजी आयएएस अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती ४० कोटी सांगितली होती. दरम्यान पूजा खेडकरने स्वत:ला ओबीसी नॉन क्रीमी लेयर स्टेटससाठी पात्र म्हटले होते. याच कारणामुळे आयएएस पूजा खेडकरच्या संपत्तीवरून तिच्या ओबीसी नॉन क्रीमी लेयर स्टेटसबाबत वाद निर्माण झाला आहे.
पीएमओने मागितली रिपोर्ट -
पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला आहे. त्याचबबरोबर LSBNAA ने राज्य सरकारकडे खेडकर संबंधित रिपोर्ट मागवली आहे.
संबंधित बातम्या