IAS Pooja Khedkar: आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पालिकेची नोटिस! घरासमोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश, आलीशान ऑडी जप्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IAS Pooja Khedkar: आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पालिकेची नोटिस! घरासमोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश, आलीशान ऑडी जप्त

IAS Pooja Khedkar: आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पालिकेची नोटिस! घरासमोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश, आलीशान ऑडी जप्त

Jul 14, 2024 08:21 AM IST

IAS Pooja Khedkar : ट्रेनी सनदी अधिकारी पूजा खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. मुळशीत शेतकऱ्यांना धमकावल्या नंतर आता पुण्यातील बणेर येथील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर त्यांनी अतिक्रमण केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पालिकेने त्यांना नोटिस बजावली आहे.

आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पालिकेची नोटिस! घरासमोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश, आलीशान ऑडी जप्त
आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पालिकेची नोटिस! घरासमोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश, आलीशान ऑडी जप्त

IAS Pooja Khedkar case update : पुण्यातून वाशिम येथे बदली झालेल्या वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. खोटे अपंगत्व प्रमाणपत्र देऊन सनदी अधिकारी बनल्याचा संशय असून या प्रकरणी त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची चौकशी समिती तर्फे पडताळणी सुरू आहे. पूजा खेडकर यांनी परवानगी नसताना देखील त्यांच्या आलीशान ऑडी गाडीवर लाल दिवा व महाराष्ट्र शासन असे लिहिल्याने पुणे पोलिसांनी त्यांची ऑडी कार जप्त केली आहे. या दरम्यान, त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर देखील पौड पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता त्यांनी पुण्यातील त्यांच्या घरासमोर अतिक्रीमण केल्याचे पुढे आले असून या प्रकरणी त्यांना पुणे महानगर पालिकेने नोटिस बजावत हे अतिक्रमण ७ दिवसांत काढण्याचे आदेश दिले आहेत.

खेडकर कुटुंबियांचे अनेक कारणामे सध्या पुढे येत आहेत. पूजा खेडकर यांनी खोटे प्रमाणपत्र देत सनदी अधिकारीपद मिळवल्या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांच्या आईने देखील हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटना ताज्या असतांना आता पुण्यातील बानेर येथील बंगल्याबाहेर खेडकर कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी फुटपाथवर कठडे करून त्यात झाडे लावली आहेत. या प्रकरणी पुणे महापालिकेने हे अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्यावर चिकटवली असून पुढील ७ दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. जर हे अतिक्रमण काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई करणयाचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त

पूजा खेडकर यांची आलीशान ऑडी कार पुणे वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. पूजा खेडकर या पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात असतांना त्यांनी त्यांच्या आलीशान कारवर लाल दिवा व महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. शासकीय नियमानुसार खासगी गाडीवर अशा प्रकारे दिवा लावता येत नाही. या प्रकरणी पुणे वाहतूक पोलिस हे खेडकर यांच्या घरी गेले असता, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना दमदाटी केली होती. दरम्यान, यानंतर त्यांच्या घरातील ऑडी कार देखील गायब करण्यात आली होती. ही कार आता पोलिसांनी जप्त केली आहे.

पूजा खेडकर यांची चौकशी

पूजा खेडकर यांची सनदी अधिकारीपदी गैरमार्गाने निवड झाली हे तपासण्यासाठी एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळून आल्या तर पूजा खेडकर यांचे हे पद जाण्याची शक्यता आहे, पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिनल व मेडिकल दृष्टी दोष चाचणीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती आहे. ययाची चौकशी ही समिति करणार आहे, यानंतर जर यात त्या दोषी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर