IAS Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाल्या, ‘मला दोषी सिद्ध करणे..’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IAS Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाल्या, ‘मला दोषी सिद्ध करणे..’

IAS Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाल्या, ‘मला दोषी सिद्ध करणे..’

Updated Jul 17, 2024 11:36 PM IST

IAS officer Puja Khedkar : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांच स्पष्टीकरण देत म्हटले की, मला दोषी सिद्ध करणे प्रत्येकाच्या दृष्टीने चुकीचे आहे

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (ANI)

IAS officer Puja Khedkar : नागरी सेवेत स्थान मिळवण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोटा आणि अपंगत्वाच्या तरतुदींचा गैरवापर केल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या परिवीक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकारी पूजा खेडकर यांनी सोमवारी सांगितले की, आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय समितीसमोर बाजू मांडल्यानंतर सत्य समोर येईल.

मी समितीसमोर साक्ष देईन. ही समिती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असावा, असे खेडकर यांनी वाशीम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. "प्रोबेशनर म्हणून माझं काम काम करणं आणि शिकणं आहे आणि तेच मी करत आहे. त्यावर मी कोणतेही भाष्य करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

पोलिसांनी पूजा खेडकरवर गुन्हा दाखल केला असून तिच्या कार्यालयाची स्वतंत्र जागा, सरकारी वाहन आणि इतर मागण्यांवरून वाद निर्माण झाला आहे. निवृत्त नोकरशहांची मुलगी खेडकर हिने नागरी सेवेत स्थान मिळवण्यासाठी ओबीसी कोटा आणि दिव्यांग अपंगत्वाच्या तरतुदीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ४० कोटीरुपयांची संपत्ती जाहीर केल्याने पूजाच्या नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

पूजाने नागरी सेवा परीक्षेत आणि नंतर आयएएस निवडीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची फेर तपासणी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सरकारचे तज्ज्ञ (समिती) निर्णय घेतील. मी किंवा तुम्ही (प्रसारमाध्यमे) किंवा जनता निर्णय घेऊ शकत नाही, असे पूजा म्हणाली.

समितीचा निर्णय आल्यावर तो सार्वजनिक आणि छाननीसाठी खुला असेल. पण सध्या सुरू असलेल्या तपासाबद्दल सांगण्याचा मला अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.

गुन्हा सिद्ध होईपर्यंत तुम्ही निर्दोष आहात, यावर भारतीय राज्यघटना आधारलेली आहे. त्यामुळे मीडिया ट्रायलद्वारे मला दोषी सिद्ध करणे प्रत्येकाच्या दृष्टीने चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

माझे जे म्हणणे असेल ते मी समितीसमोर देईन आणि सत्य समोर येईल, असे खेडकर म्हणाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील परिवीक्षाधीन कालावधीत मनमानीचा आरोप झाल्यानंतर पूजा यांची नुकतीच पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली होती. कार्यालयाची स्वतंत्र जागा, सरकारी वाहन आणि इतर मागण्यांवरून वाद निर्माण झाला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर