मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IAS Nitin Kareer : ज्येष्ठ आयएएस अधिकारी नितीन करीर यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

IAS Nitin Kareer : ज्येष्ठ आयएएस अधिकारी नितीन करीर यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Dec 31, 2023 07:09 PM IST

ज्येष्ठ आयएएस अधिकारी नितीन करीर यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव
आयएएस अधिकारी नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव

ज्येष्ठ आयएएस अधिकारी नितीन करीर यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे आज निवृत्त होत आहेत. सौनिक यांना मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, तो मंजूर न झाल्यानं नितीन करीर यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. करीर यांचा कार्यकाळ ३० मार्च २०२४ पर्यंत राहणार आहे. करीर हे अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) म्हणून कार्यरत होते.

 

 

WhatsApp channel