Iqbal singh chahal : इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; आता गृहखात्यात मिळाली मोठी जबाबदारी-ias iqbal singh chahal transferred and given charge of additional chief secretary in home department ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Iqbal singh chahal : इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; आता गृहखात्यात मिळाली मोठी जबाबदारी

Iqbal singh chahal : इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; आता गृहखात्यात मिळाली मोठी जबाबदारी

Aug 22, 2024 07:28 PM IST

Ias Iqbal singh chahal : इक्बालसिंह चहल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्याकडे गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली
इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal singh chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इक्बालसिंह चहल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्याकडे गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अपर मुख्य सचिव (खनिकर्म), उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभारही चहल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

बदलापूरमधील प्रकरणावरून राज्यात सरकारवरोधात तसेच पोलीस प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चहल याआधी मुंबई महापालिका आयुक्तपदी दीर्घकाळ राहिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता पाच महिन्यात पुन्हा एकदा चहल यांची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर,जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली होती.

 

आतागृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदाचा कार्यभार तेराज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून स्वीकारणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून अपर मुख्य सचिव (खनिकर्म), उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यत असणार आहे.