पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती दर्शनासाठी सरन्यायाधीशांच्या घरी, संजय राऊत भडकले! म्हणाले…-i feel chandrachud should dissociate sanjay raut questions chief justices impartiality after ganesh aarti with pm modi ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती दर्शनासाठी सरन्यायाधीशांच्या घरी, संजय राऊत भडकले! म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती दर्शनासाठी सरन्यायाधीशांच्या घरी, संजय राऊत भडकले! म्हणाले…

Sep 12, 2024 03:59 PM IST

Sanjay Raut On DY Chandrachud: पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती दर्शनासाठी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड घरी गेल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरन्यायाधीशांच्या निःपक्षपातीपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्याधीशांच्या भेटीवर संजय राऊत काय म्हणाले? वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्याधीशांच्या भेटीवर संजय राऊत काय म्हणाले? वाचा

Sanjay Raut News: पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती दर्शनासाठी सरन्यायाधीशांच्या घरी गेल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निःपक्षपातीपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले असून संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याद्वारे सरन्यायाधीशांच्या महाराष्ट्र खटल्याचा निष्पक्ष निकाल देण्याच्या क्षमतेवर शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे, असे या निकालात म्हटले आहे.

'खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली तर जात नाही ना?' असा प्रश्न नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीमुळे उपस्थित केला जात आहे.

'नरेंद्र मोदी आतापर्यंत गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले याची माहिती माझ्याकडे नाही. पण काल पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन ज्या पद्धतीने बाप्पांचे दर्शन घेतले आणि आरती केली.हे पाहता धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान, असे चित्र पाहायला मिळाले', असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्याबाबत आम्ही जी लढाई लढत आहोत, त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? या प्रकरणाबाबत तारखांवर तारखा का देताय? याबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाली. पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात स्वतःहून हस्तक्षेप घेतला जात आहे. परंतु, महाराष्ट्रातील बलात्कार अत्याचार प्रकरणात अद्याप एकही शब्द बोलले गेले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर आतापर्यंत तारीख पे तारीख दिली जात आहे, असे का होत आहे, असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांच्यावर खटला दाखल करा- अतुल भातखळकर

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. तर, संजय राऊतांच्या पोटात का दुखू लागले. मोदींनी दिल्लीतील औरंगजेबाचे नाव हटवले. ते मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे यांच्यासारखे राजकारण करत नाहीत. याआधीही संजय राऊतांनी निवडणूक आयोगाबद्दल हवे तसे बोलले होते. न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा’, अशी भाजप नेते मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Whats_app_banner
विभाग