Ashish Pandey TC in Western Railway : महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला व मुस्लिमांना बिसनेस देणार नाही असे म्हणाऱ्या एका उत्तर भारतीय मुजोर टीसी आशीष पांडे याला रेल्वेने चांगलाच हिसका दाखवत त्याचा मुजोरपणा उतरवला आहे. त्याला रेल्वे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या सोबतच त्याच्यावर चौकशी समिती देखील बसवण्यात आली आहे.
आशीष पांडे व एका मराठी व्यापाराचे दूरध्वनी वरील संभाषण व्हायरल झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची माहिती मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी ट्विटरवर दिली आहे.
आशीष पांडे हा रेल्वेमध्ये टीसी आहे. तसेच तो मराठी आणि मुस्लिम द्वेषी असल्याचं त्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून उघड झालं आहे. काही दिवसांपूर्वी आशीष पांडे याने एका मराठी व्यापाऱ्याला फोन केला होता. यावेळी आशीष पांडे याने मराठी व्यापाऱ्याला उलटसुलट बोलत असल्याचं दिसत आहे. पांडेने ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे की, मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मुस्लिम व मराठी लोकांना बिझनेसच देत नाही. मला जर कोणी मराठी किंवा मुस्लिम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षात देखील बसत नाही. त्या ऐवजी मी उत्तर भारतीय व्यक्तीच्या रिक्षात बसतो. मी परवा तुमचा मुंबेर ट्रू कॉलर पाहिला. यात तुमचा नंबर दिसला. तुम्ही मराठी असल्याचं समजल्यावर मी तुमचा नंबर डिलिट केला, हे तुम्हाला माहिती झालं असेलच. मला मुस्लिम व महाराष्ट्रीयन माणसाला एका रुपयांचा देखील बिझनेस द्यायचा नाही. मी सकाळी ९ वाजता कामाला जातो व १० वाजेपर्यंत मी ५ हजार मिळवलेले असतात. मला पैशांचा गर्व नाही, पण मी मुंबईत असेपर्यंत मराठी व मुस्लिमांना बिझनेस देणार नाही असे आशीष पांडे याने या मराठी व्यापाऱ्याला म्हटलं आहे. यानंतर आशिष पांडे याने फोन कट केला.
दोघांच्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मिडियार व्हायरल झाली. ही क्लिप रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत देखील पोहोचली. यानंतर या घटनेची चौकशी करून आशीष पांडे हे दोषी आढळल्याने रेल्वेने मुजोर पांडेला निलंबित करण्यात आलं आहे. त्याच्यावर चौकशी समिति बसवण्यात आली आहे.
या कारवाई प्रकरणी मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी एक्सवर या कारवाई बाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी ही ऑडिओ क्लिप देखील यात उपलोड केली आहे. तसेच या घटनेची रेल्वेने गंभीर दखल घेतली असल्याचं म्हणत आशिष पांडे याला निलंबित केलं असल्याचं म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लीप खरी आहे की खोटी हे देखील तपासण्यात आलं आहे. यानंतर आशीष पांडेला निलंबित करण्यात आले असून त्याची चौकशी देखील केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.