मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Crime: धक्कादायक! कॅन्सरच्या उपचाराला पैसे नव्हते! पतीनं पत्नी व मुलीला शीतपेयातून विष देत उचललं टोकाचं पाऊल

Nagpur Crime: धक्कादायक! कॅन्सरच्या उपचाराला पैसे नव्हते! पतीनं पत्नी व मुलीला शीतपेयातून विष देत उचललं टोकाचं पाऊल

Jul 06, 2024 08:34 AM IST

Nagpur suicide : नागपूरमध्ये मनाला चटका लावणारी एक घटना उघडकीस आली आहे. कॅन्सरच्या उपचाराला पैसे नसल्याने पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पतीने पत्नीला व मुलीला विष पाजले.

कॅन्सरच्या उपचाराला पैसे नव्हते! पतीनं पत्नी व मुलीला शीतपेयातून विष देत उचललं टोकाचं पाऊल
कॅन्सरच्या उपचाराला पैसे नव्हते! पतीनं पत्नी व मुलीला शीतपेयातून विष देत उचललं टोकाचं पाऊल

Nagpur Crime News Updates : नागपूर येथून मनाला चटका लावणारी एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने एका एका दाम्पत्यानं टोकाचं पाऊलं उचललं आहे. पतीनं पत्नीला व मुलीला शीत पेयातून विष पाजत जीवन संपवलं. हे दाम्पत्य केरळ येथून नागपूरला उपचार घेण्यासाठी आले होते. ही घटना शहरातील जरीपटका येथील विजयश्री नगर येथे घडली आहे. या घटनेत पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर मुलीचा जीव सुदैवाने वाचला आहे. मुलीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रीजु विजयन उर्फ विजय नायर (वय ४५), व प्रिया रीजु नायर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव आहे. तर त्यांची मुलगी वैष्णवी ही वाचली आहे. रिजू आणि नायर हे दोघेही केरळ येथून नागपूरला आले होते. प्रियाला ब्लड कॅन्सर आहे. यावर उपचार घेण्यासाठी ते नागपूरला आले होते. मात्र, प्रियाची प्रकृती ही ठीक होत नव्हती. दोन महिन्यांपासून ते नागपूरला राहत होते. मोठ्या दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, रोजचा खर्च करणे रीजु नायर यांना शक्य होत नव्हते. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पत्नीच्या उपचाराचा खर्च करायचा कसा या विवंचनेत रिजू होता.

ट्रेंडिंग न्यूज

उपचारात सर्व पैसे संपले होते. त्याने कर्ज देखील मोठ्या प्रमाणात घेतले होते. असे असतांना त्याच्या जवळ पत्नीसाठी औषधे घेण्याचे पैसे देखील शिल्लक नव्हते. त्यामुळे रीजु याने पत्नी आणि मुलगी वैष्णवी हीला शीतपेयातून विष दिले. तसेच स्वत: देखील विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेत पती पत्नीचा मृत्यू झाला तर वैष्णवी ही बचावली आहे. वैष्णवीवर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली. जरीपटका पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असता त्यांना तिथे मृतक रीजु नायर आणि प्रिया नायर यांचे आधारकार्ड आढळले. प्रिया यांच्या आधारकार्डवर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी येथील पत्ता असल्याचे आढळले आहे. पोलिस त्यांच्या नतेवाईकांचा शोध घेत आहेत.

WhatsApp channel
विभाग