मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Panvel: बहिणीच्या घरी येण्यास पत्नीचा नकार; संतापलेल्या पतीनं झोपेतच तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं

Panvel: बहिणीच्या घरी येण्यास पत्नीचा नकार; संतापलेल्या पतीनं झोपेतच तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 12, 2024 01:15 PM IST

Panvel Man throws Acid on Wife: हैदराबाद येथे बहिणीच्या घरी जाण्यास नकार दिल्याने पनवेल पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना उघडकीस आली.

Panvel crime
Panvel crime

हैदराबाद येथील बहिणीच्या घरी जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. याप्रकरणी पनवेल येथील एका २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जानेवारी रोजी घडली. पीडित महिला कोलकात्यातील कोलकात्यातील आपल्या मूळ गेली असता तेथील पोलीस ठाण्यात तक्रार पतीविरोधात तक्रार नोंदवली. हे प्रकरण कोलकात्या पोलिसांनी पनवेल पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे.

मजान सिद्दीकी गाझी (वय, २८) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पत्नी अमीना खातून ऊर्फ अमीन बीबी रमजान गाझीला (वय, २८) आपल्यासोबत हैद्राबादला येण्यास आणि काही दिवस राहण्यास भाग पाडत होता. मात्र, तिने हैद्राबादला जाण्यास नकार होता. यामुळे १९ जानेवारी रोजी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर ती झोपी गेल्यानंतर आरोपीने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. या घटनेनंतर तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

यानंतर पीडिता कोलकात्यातील आपल्या मूळ गावी गेली, जिथे तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिने कोलकात्यात एफआयआर दाखल केला जो रविवारी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तिथल्या पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून झिरो नंबरवर एफआयआर नोंदवला आणि नंतर तो इथे ट्रान्सफर केला. ती तिथेच असल्याने तिच्या जळालेल्या जखमांचे गांभीर्य आणि अशा अवस्थेत तिने तिथपर्यंत कसा प्रवास केला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही,' अशी माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश शेळकर यांनी दिली.

गाझी आणि अमीना यांना तीन मुले असून ते पनवेल तालुक्यातील वावंजे येथील खैरणे गावातील रिझवान कंपनीजवळ गेल्या तीन महिन्यांपासून राहत आहेत. पती मजूर होता, तर पत्नी एका कंपनीत काम करत होती.

आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

WhatsApp channel

विभाग