पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने काढला व्हिडिओ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने काढला व्हिडिओ

पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पाच वर्षांच्या मुलासमोर कात्रीने केली पत्नीची हत्या! घटनेनंतर आरोपीने काढला व्हिडिओ

Jan 23, 2025 03:15 PM IST

Pune Kharadi Crime : पुण्यात खराडी येथे कौटुंबिक करणातून पतीने पत्नीच्या गळ्यात कात्रीने वार करून तिची हत्या केल्याची घटना खराडी येथे घडली. आरोपीने हत्या केल्यावर या घटनेचा व्हिडिओ देखील काढला असल्याचं पुढं आलं आहे.

किरकोळ वादातून कात्रीने गळ्यावर वार करून पतीने केली पत्नीची हत्या; हत्येनंतर काढला व्हिडिओ, पुण्यातील खराडी भागातील घटना
किरकोळ वादातून कात्रीने गळ्यावर वार करून पतीने केली पत्नीची हत्या; हत्येनंतर काढला व्हिडिओ, पुण्यातील खराडी भागातील घटना

Pune Kharadi Crime : पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किरकोळ कारणातून हत्या करण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. खराडी येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पाच वर्षांच्या मुलासमोर पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने व्हिडिओ काढत अनेक गंभीर आरोप देखील केले आहे.  हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना बुधवारी (दि २२) पहाटेच्या सुमारास रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती शिवदास गिते (वय २८, रा. गल्ली क्रमांक ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर शिवदास तुकाराम गीते (वय ३७) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी हत्या झालेल्या महिलेच्या बहिणीने तक्रार दिली आहे.  

या घटनेचे वृत्त असे की, आरोपी शिवदास गिते हा मूळचा बीडमधील रहिवासी आहे. तो न्यायालायात टंकलेखक म्हणून काम करतो. दोघांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. सध्या दोघेही खराडी परिसरात तुळजाभवानीनगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून शिवदास व ज्योती यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद होत होते. शिवदास हा ज्योतिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुले दोघांचे  वाद टोकाला जात होते. या दाम्पत्याला ५ वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा होता. ज्योती शिलाई मशीनद्वारे कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामं करत होती तर दुसऱ्या बाजूला शिवदास गिते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे स्टेनो म्हणून कम करत होता. 

दरम्यान, जानेवारी १५ रोजी झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाला होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याने ही परीक्षा परत द्यावी या साठी ज्योती ही शिवदासच्या मागे लागली होती.  २२ जानेवारी रोजी जेव्हा ज्योतीचे तिच्या बहिणीसोबत बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास हा त्रास देत असल्याचे सांगितले.

बुधवारी पहाटे देखील ज्योतिने शिवदासला पुन्हा परीक्षा देण्यास सांगितले. यावेळी  ज्योती व पती शिवदास यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादात राग अनावर झाल्याने शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ज्योती ही गंभीर जखमी झाली. घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या नंतर त्याने तिचा व्हिडिओ काढला. यावेळी त्याचा पाच वर्षांचा मुलगा देखील त्या ठिकाणी उपस्थित होता.  

दरम्यान दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून झोपेत असलेले शेजारी जागे झाले. त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. शेजारी जेव्हा त्यांच्या घरात गेले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ज्योती ही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती. या घटनेची माहिती शेजऱ्यांनी चंदननगर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने ज्योतीला ससून रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी तिला तपासले. त्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात गेला

हत्या केल्यावर  शिवदास हा स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याच देखील सांगितलं आहे.   पोलिसांनी आरोपी पती शिवदासला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवदासला अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर