मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Family Court : बायकोनं विकत घेतलेल्या घरावर नवऱ्याचा अधिकार नाही! घटस्फोट झाल्यावर घरी जाण्यासही मनाई!

Mumbai Family Court : बायकोनं विकत घेतलेल्या घरावर नवऱ्याचा अधिकार नाही! घटस्फोट झाल्यावर घरी जाण्यासही मनाई!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 09, 2024 10:40 AM IST

Mumbai Family Court : मुंबईत कौटुंबिक न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. पत्नीने जर पैशाने घर घेतले असेल तर त्या घरावर पतीला हक्क सांगता येणार नाही. तसेच तिच्या घरी सुद्धा जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

बायकोनं विकत घेतलेल्या घरावर नवऱ्याचा अधिकार नाही! घटस्फोट झाल्यावर घरी जाण्यासही मनाई!
बायकोनं विकत घेतलेल्या घरावर नवऱ्याचा अधिकार नाही! घटस्फोट झाल्यावर घरी जाण्यासही मनाई!

Maharashtra News : पत्नीने जर तिच्या पैशांनी घर घेतले असेल तर ती एकटीच त्या घराची मालकीण असून तिच्या घरावर पतीचा कोणताही हक्क राहणार नाही. जर तिचा घटस्फोट झाला असेल तर पतीने तीच्या घरी देखील जाऊ नये असा निर्णय मुंबई कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. या सोबतच को ओनर म्हणून पतीचे नाव प्रॉपर्टीवर असल्यास ते देखील काढून कटण्यात यावे असे आदेश देखील कोर्टाने दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune murder : खळबळजनक! पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून; घरात पडून मृत्यूचा रचला बनाव

एका जोडप्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यावर घराच्या मालकी हक्कप्रकरणी कोर्टात दावा केला होता. अर्ज दाखल केलेल्या  जोडप्याचे करीरोड आणि गोरेगाव या ठिकाणी घर असून हे घर पत्नीने तिच्या पैशाने विकत घेतले आहे. पत्नीने दावा केला की घर घेतांना घराचे पैसे हे तिने  दिले. त्यामुळे ते घर तिचे असल्याचा दावा पत्नीने केला. मात्र, या घराचे पैसे दिल्याचे पुरावे कोर्टात सादर करण्यास पत्नी अपयशी ठरली. तर घराचे पूर्ण पैसे हे पतीने दिल्याचे देखील सिद्ध झाले नाही. पण घर हे पतीच्या नावाने खरेदी करण्यात आल्याने त्याची मालकी ही पतीकडेच राहील, असे न्यायालयाने त्यांचा आदेशात म्हटले आहे.

Mayank Yadav Injury : मयंक यादवची दुखापत किती गंभीर? या सामन्यांमधून बाहेर, LSG च्या सीईओंनी दिली माहिती

कोर्टात दावा केलेल्या जोडप्याचा विवाह हा २००१ मध्ये झाला होता. त्यांना दोन मुली आहे. त्यांनी गोरेगाव येथे घर घेतले होते. या साठी होम लोन त्यांनी घेतले आहे. पण घराचे संपूर्ण हप्ते हे मीच भारत असल्याचा दावा पत्नीने केला होता. तिचा पती व सासरचे त्रास देत असल्याने तिने अॅड. परेश देसाई या वकिला मार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तिने पतीच्या करीरोड आणि गोरेगाव येथील घरावर दावा सांगितला. हे घर खरेदी करण्यासाठी तिचे अनामत रक्कम दिल्याचा दावा तिने केला.

या सोबतच गृहकर्जाचे हप्ते देखील भरत असल्याचा दावा तिने केला होता. मात्र या बाबत ची कोणतहीही कागदपत्रे ती सादर करू शकली नाही. तर पतीने गोरेगाव येथील घराचा मी सहमालक असून तशी सर्व कागदपत्रांवर नोंद आहे, असा युक्तिवाद त्याने केला. तर यावर पत्नीने त्या घराचा को ओनर हा पती असला तरी तिने ते घर खरेदी केले असून त्या घराची सर्व कागदपत्रे मिळालेली नाही . तर पतीने देखील या घरासाठी पैसे दिल्याचा पुरवा नसल्याने या घराची मालकी ही पत्नीनेकडेच राहावी असे कोर्टाने मान्य केले.

IPL_Entry_Point

विभाग