मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder: देवदर्शनाला नेण्याच्या बहाण्याने पत्नीचा दरीत ढकलून खून; खुनाचे कारण ऐकून व्हाल हैराण!

Pune murder: देवदर्शनाला नेण्याच्या बहाण्याने पत्नीचा दरीत ढकलून खून; खुनाचे कारण ऐकून व्हाल हैराण!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 15, 2024 01:55 PM IST

Pune murder news : पुण्यात एका पतीने पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने मांढरदेवी येथे नेते तिला दरीत ढकलुन दिले. मात्र, ती झाडावर अडकल्याने तिचा साडीने गळा आवळून खून करण्यात आला.

Pune murder news
Pune murder news

Pune lonikand murder news : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला देवदर्शनाला सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे घेऊन जात तिला दरीत ढकलुन दिले. मात्र, ती झाडाला अडकल्याने बचावली. तिच्यावर कोणतीही दया न दाखवता, आरोपी पतीने तिचा साडीने गळा आवळून खून केला. लोणीकंद पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खुनामागचे धक्कादायक कारण पुढे आले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

ललिता अमोलसिंग जाधव (वय ३६, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग मुरली जाधव (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गेल्यावर्षी घडली होती. आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याने दिली होती. दरम्यान, लोणीकंद पोलिस ललिताचा शोध घेत होते. तब्बल वर्षभरानंतर ललीताच्या खुनाचा उलगडा झाला आहे.

HIngoli Murder : हिंगोली हादरले! पैसे देत नसल्याच्या रागातून सख्ख्या भावासह आई- वडिलांची हत्या; अपघाताचा रचला बनाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोलसिंगने त्याची पत्नी ललिता ही पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिली होती. पोलिस ललिताचा शोध घेत होते. दरम्यान, अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू होता.

दरम्यान वर्षभरानंतर पोलिसांना या प्रकरणी महत्वाची माहिती मिळाली. त्यानुसार संशयाची सुई ही पती अमोलसिंगवर गेली. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने ललिताचा खून केला आल्याची कबुली दिली.

अमोलसिंगने आणि ललितामध्ये दहा वर्षांचे अंतर होते. कुटुंबीयांच्या दबाबामुळे त्याने वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला. मात्र, दोघांचे कधी पटले नाही. त्यांचा सातत्याने वाद होता होता. अमोलसिंहला ललिता पासून घटस्फोट घ्यायचा होता. तशी मागणी देखील त्याने तिच्याकडे केली होती. मात्र, याला तिने नकार दिला. यामुळे त्याचा तिच्यावर राग होता. यामुळे त्याने ललिताचा खून करण्याचे ठरवले.

२८ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याने कार भाड्याने घेऊन ललिताला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे नेले. दरम्यान, मांढरदेवी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने मोटारचालकाला मोटार वाहनतळावर लावण्यास सांगितले. त्यानंतर दोघे जण घाटातून चालत निघाले. घाटात ललिताशी गप्पा मारण्याचा बहाणा केला. यावेळी दरीजवळ थांबलेल्या ललिताला त्याने धक्का दिल्याने ती दरीत कोसळली. मात्र, ती ‌झाडाच्या फांदीत अडकली. ती जीवंत असल्याचे पाहून अमोलसिंग देखील दरीत उतरला. त्याने तिचा साडीने गळा आवळून तिचा खून केला. ती मरण पावल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह दरीत ढकलून तो पसार झाला. यानंतर त्याने, ललिता बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.

WhatsApp channel