Pune Crime: चारित्र्याचा संशय! मद्यपी बापाने ९ वर्षीय मुलीसमोर केला आईचा खून
पुण्यात पिंपरी चिंचवड येथे एका मद्यपी बापाने त्याच्या मुलीसमोर पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे : पुण्यात पिंपरी चिंचवड येथील वकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका मद्यपीने त्याच्या ९ वर्षीय मुलीसमोर तिच्या आईचा खून केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी बापाला पकडले आहे. या घटनेमुळे ३ मुले उघड्यावर आले आहेत. ही घटना सोमवारी रात्री घडली.
ललिता पुजारी अस खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रमेश पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश हा नेहमी मद्यपान करायचा. दारूच्या आहारी गेल्याने त्याचे पत्नी ललिता हिला त्यांच्या मुलांसमोरच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. त्यांना पाच वर्षांचा मुलगा, नऊ वर्षीय मुलगी आणि तिसरी मुलगी हॉस्टेलला राहते. सोमवारी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला. त्याचा राग अनावर झाल्याने आणि दारूच्या नशेत असल्याने त्याने ललिताच्या डोक्यात फरशी घातली. यावेळी त्याची मुलगी त्या ठिकाणीच होती. गंभीर जखमी झालेली ललिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान पोलिसांनी आरोपी रामेशला अटक केली आहे. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेमुळे त्याची तिन्ही मुले आता पोरकी झाली आहेत.
संबंधित बातम्या