Mumbai murder : संपत्ती विकण्याच्या वादातून पतीने पत्नीची केली हत्या, तर भावावरही प्राणघातक हल्ला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai murder : संपत्ती विकण्याच्या वादातून पतीने पत्नीची केली हत्या, तर भावावरही प्राणघातक हल्ला

Mumbai murder : संपत्ती विकण्याच्या वादातून पतीने पत्नीची केली हत्या, तर भावावरही प्राणघातक हल्ला

Updated Jan 01, 2024 08:44 AM IST

Mumbai malad crime news : मुंबईतील मालाड येथे संपत्ती विकण्याच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आली आहे. आरोपीने त्याच्या भावावरही हल्ला केला असून तो गंभीर जखमी आहे.

husband murderd wife
husband murderd wife

Mumbai malad murder news : मुंबईत संपत्ती विकण्याच्या वादातून एकाने आपल्या पत्नीच्या डोक्यात फ्लॉवरपॉट मारून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने भावावरही प्राणघातक हल्ला केला असून यात भाऊ हा गंभीर जखमी झळा आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला आहे. या प्रकरणी बांगनूरनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Maharashtra Weather update: नव्या वर्षात राज्यात ढगाळ हवामान; कुठे पाऊस तर कुठे गारठा, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय ?

ड्रेसन मार्कोस डिसा असे आरोपी पतीचे नाव आहे. तर चित्रा डेसन डिसा असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. डेमियन मार्कोस डिसा असे जखमी भावाचे नाव आहे. डेमियनची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रेसन आणि त्याची पत्नी चित्रा यांच्यासोबत डेमियन मालाडमधील एव्हरशाईन, पद्मनगरमध्ये राहत होता. डेमियनच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. औषधोपचाराचा खर्च जास्त होता. यामुळे ड्रेसनने त्याची मालमत्ता विकायचा निर्णय घेतला. पण या निर्णयाला डेमियनसह पत्नी चित्राने विरोध केला.

यातुन त्यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने रागाच्या भरात ड्रेसनने पत्नी चित्रासह डेमियनच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी चित्रा आणि डेमीयम हे दोघेही जखमी झाले. स्थानिकांनी घटनास्थळी येत जखमींना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचाराआधी चित्राला मृत घोषित केले. तर, डेमियनची प्रकृती ही गंभीर आहे. त्याच्यावर देखील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर