Nagpur Murder : मित्राला व्हिडिओ कॉल करणं जीवावर बेतलं; पतीनं डोक्यात लोखंडी रॉड मारून संपवलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Murder : मित्राला व्हिडिओ कॉल करणं जीवावर बेतलं; पतीनं डोक्यात लोखंडी रॉड मारून संपवलं

Nagpur Murder : मित्राला व्हिडिओ कॉल करणं जीवावर बेतलं; पतीनं डोक्यात लोखंडी रॉड मारून संपवलं

Jun 26, 2024 11:30 PM IST

Husband Killed Wife : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केली. पत्नी आधुनिक विचारांची होती, सोशल मीडियावर सक्रीय होती, तसेच जिमलाही जात होती. या गोष्टी पतीला खटकत होत्या.

मृत मन्नत कौर
मृत मन्नत कौर

नागपूरमधील कपिल नगर येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने आपल्या पत्नीची डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून  दिलप्रीत उर्फ विक्की कुलविंदरसिंह विर्क (३०) असे त्याचे नाव आहे. मृत पत्नीचे नाव मन्नत कौर (२४) होते.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पतीला जुगाराचा नाद होता. त्याचबरोबर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणामुळे दोघांमध्ये वाद होत होता. मृत मन्नत कौर मॉडर्न विचारांची होती तसेच सोशल मीडियावर खूप सक्रीय असायची. तसेच ती जिममध्ये जात होता. यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.  चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळलेली मन्नत त्याच्यापासून दूर माहेरी राहत होती आणि त्याच्यापासून ती घटस्फोट घेऊ इच्छित होती. पण त्याला हे मान्य नव्हते.

या दाम्पत्याला २ वर्षाचा मुलगाही आहे. विक्की आधी गड्डीगोदाम येथे कार एसेसरीजची दुकान चालवत होता. तेथे व्यवसाय तोट्यात गेल्याने त्याने कपिलनगर येथे किंग्स एसेसरीज नावाने दुकान सुरू केले. गेल्या पाच वर्षापासून विक्की आणि मन्नत दरम्यान प्रेम संबंध होते. २०२२ मध्ये दोघांनी लव्ह मॅरेज केले. कुटूंबीय यामुळे नाराज होते. मात्र विक्की आपल्या पत्नीला घेऊन कुटूंबासोबतच रहात होता. घरात वाद सुरू झाल्यानंतर काही महिन्यापूर्वी मन्नतच्या सांगण्यावरून विक्कीने पंचमवैद्य आर्य सोसायटीत एक फ्लॅट भाड्याने घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते.

मंगळवारी पुन्हा झाला वाद -

विक्कीला कोणीतरी सांगितले होते की, त्याची पत्नी मन्नत आणि जरीपटका परिसरातील कुख्यात गुन्हेगार भुऱ्या यांच्यात अनैतिक संबंध आहेत. विक्की आपल्या आई-वडिलांसोबत त्यांच्या घरात रहात होता. जेव्हा कधी फ्लॅटवर जात होता, तेव्हा मन्नतशी वाद होत होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मंगळवारी सकाळीही दोघांमध्ये यावरून वाद झाला होता. विक्कीने तिला मारहाण केली. मन्नतने आपल्या कुटूंबाला माहिती दिली. मन्नतने आपला भाऊ विशालसोबत कपिलनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्गा नोंदवला व काही तासात विक्कीला सोडून दिले.

रॉड डोक्यात घालून केली हत्या -

रात्री तो पुन्हा फ्लॅटवर गेल्यावर वाद सुरू झाला. मन्नतने आपल्या मदतीसाठी जिम मधील मित्र लाजरस इमानुअल याला व्हिडिओ कॉल केला. यावेळी विक्कीने लोखंडाच्या रॉडने मन्नतच्या डोक्यावर जोरत वार केला. वार वर्मी लागल्याने मन्नत जागीच कोसळली व तिचा मृत्यू झाला. मन्नत निपचिप पडल्यानंतर तो तेथून पसार झाला. मन्नत आणि विक्कीशी संपर्क होत नव्हता. नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री ११ वाजता कुटूंबीयतिच्या फ्लॅटवर गेले मात्र दरवाजाला कुलूप होते. कपिलनगर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस कुटूंप तोडून आत गेले. आतील दृष्य पाहून सर्वांना धक्का बसला. मन्नत रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडली होती. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला गेला. हत्या केल्यानंतर विक्की बारमध्ये जाऊन दारू पीत बसला. रात्री ३ वाजता त्याला अटक करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर