मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri-chinchwad murder : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवऱ्याने केला खून

Pimpri-chinchwad murder : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवऱ्याने केला खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 13, 2024 11:09 AM IST

Pimpri-chinchwad moshi wife murder : पुण्यात पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) येथील मोशी परिसरात एका पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने त्याने हा खून केला आहे.

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने  बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवऱ्याने केला खून
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवऱ्याने केला खून

Pimpri-chinchwad moshi wife murder : पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोशी येथे दारुड्या पतीने पत्नीला दारू प्यायला पैसे मागितले. मात्र, तिने ते न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. ही घटना रविवारी (१० मार्च) घडली.

जयश्री मारुती बाबना (वय ४७, रा. सिल्वर करिष्मा बिल्डिंगसमोर शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर मारुती बाबना (वय ५०) असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा बालाजी मारुती बाबना (वय २९) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

hemant godse news : महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच शिंदे सेनेकडून नाशिकच्या उमेदवाराची घोषणा

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती बाबना याला दारूचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी तो पत्नीला रोज त्रास देत होता. रविवारी त्याने पत्नी जयश्री यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र जयश्री यांनी दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून मारुती याला राग आला. त्याने रागाच्या भरात पत्नी जयश्री यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने घरातील लोखंडी रॉड जयश्री यांच्या डोक्यात मारल्याने जयश्री या गंभीर जखमी झाल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Mumbai Local Stations Renaming: मुंबईतील ८ ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे नामांतर; आता करीरोड, मुंबई सेंट्रलचे होणार...

भरधाव दुचाकीची महिलेला धडक

रिक्षाचालकाला विचारपूस करत असलेल्या महिलेला एका भरधाव दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. त्यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना भोसरी येथे घडली. या प्रकरणी जखमी ५३ वर्षीय महिलेने १० मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मोशी येथील एका रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. त्याचे रिपोर्ट आणण्यासाठी जात असताना महिला भोसरीमधील पीएमटी बस थांब्यावर आल्या. त्या एका रिक्षा चालकाकडे विचारपूस करत असताना एक दुचाकीस्वार भरधाव आला. त्याने फिर्यादी महिलेला जोरात धडक दिली. त्यात महिला जखमी झाल्या. त्यानंतर दुचाकीस्वार अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

IPL_Entry_Point