Nashik Crime : नाशिक हादरले ! पंचवटीत मंदिर परिसरात पोत्यात सापडल्या मानवी कवट्या अन् हाडे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Crime : नाशिक हादरले ! पंचवटीत मंदिर परिसरात पोत्यात सापडल्या मानवी कवट्या अन् हाडे

Nashik Crime : नाशिक हादरले ! पंचवटीत मंदिर परिसरात पोत्यात सापडल्या मानवी कवट्या अन् हाडे

Published Jun 16, 2024 10:30 AM IST

Nashik Crime : नाशिक येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंचवटी परिसरातील एरंडवाडी येथील एका मंदिराच्या आवारात मानवी हाडे व कवट्या असलेली पोतं सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 नाशिक हादरले ! पंचवटीत मंदिर परिसरात पोत्यात सापडल्या मानवी कवट्या अन् हाडे
नाशिक हादरले ! पंचवटीत मंदिर परिसरात पोत्यात सापडल्या मानवी कवट्या अन् हाडे (HT_PRINT)

Nashik crime news : नाशिक येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंचवटी येथे एरंडवाडी येथील एका मंदिराच्या आवारात एक पोत सापडलं असून त्यात मानवी हाडे आणि कवट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशीतीचे वातावरण आहे. अघोरी कृत्यातून कुणीतरी हा प्रकार केला असल्याची चर्चा आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी ही हाडे तपासली असून ती मानवी हाडे नसून प्लॅस्टिकची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

   नाशिकचा पंचवटी परिसर गजबजलेला असतो. या परिसरात असलेल्या एरंडवाडी येथील मंदिराजवळ एक पोते आढळले. हे पोते काहींनी उघडून पाहिले असता त्यात मानवी हाडे आणि कवट्या आढळल्या. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिस देखील तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी कवटी असलेले पोत ताब्यात घेतले. 

तसेच फॉरेन्सिक विभागाचे पथक देखील आले. या हाडांची तपासणी करण्यात आली यात ही हाडे प्लॅस्टिकची असल्याचे उघड झाले. कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी हा प्रकार का केला तसेच कुणी केला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तपास सुरू

या प्रकरणी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. पंचवटी पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. हा प्रकार करण्यामागे काय कारण असू शकतं याचा पोलिस शोध घेत आहेत. हा अघोरी प्रकार असून जादू टोणा करण्याच्या उद्देशाने हा खोडसाळ पणा करण्यात आला का या दृष्टीने देखील तपास केला जाणार आहे. या साठी मंदिरातील पुजारी व इतर नागरिकांची चौकशी केली जाणार आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले जाणार आहे. मंदिर परिसरामध्ये हाडे आणून नेमका कोणता प्रकार करण्यात आला हे तपास झाल्यावर समजणार आहे. पोलिस शोध घेत आहेत. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर