mumbai ice cream : माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं 'ते' आईसक्रीम गाझियाबादच्या कंपनीत झाले होते तयार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai ice cream : माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं 'ते' आईसक्रीम गाझियाबादच्या कंपनीत झाले होते तयार!

mumbai ice cream : माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं 'ते' आईसक्रीम गाझियाबादच्या कंपनीत झाले होते तयार!

Jun 14, 2024 12:19 PM IST

mumbai ice cream news : मुंबईतील मलाड इथं एका डॉक्टर तरुणाला ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीमच्या कोनमध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा सापडला आहे. त्यामुळं खळबळ उडाली होती. दरम्यान, हे आइसक्रीम गाझियाबादमधील एका कंपनीत तयार करण्यात आल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे.

माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं 'ते' आईसक्रीम गाझियाबादच्या कंपनीत झाले होते तयार!
माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं 'ते' आईसक्रीम गाझियाबादच्या कंपनीत झाले होते तयार!

Human Finger Found in Ice-cream : मुंबईत मलाड येथे राहणाऱ्या एका डॉक्टर तरुणाने ऑनलाइन आइसक्रीम मागवले होते. हे आइसक्रीम खातांना कोनमध्ये माणसाची बोटे आढळली होती. हे पाहून या डॉक्टरला तरुणाला धक्काच बसला होता. या डॉक्टर तरुणाने थेट मलाड पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच हे आईस्क्रीम व मानवी बोट फॉरेसिक विभागाकडे तपासासाठी पाठवले होते. दरम्यान, तपास करतांना मलाड पोलिसांनी पुण्यातील हडपसर येथील कंपनीवर छापा टाकला होता. तर त्यानंतर थेट गाजिबाद येथे असणाऱ्या एका कंपनीत हे आइस क्रीम तयार होत असल्याची माहिती तपासात आढळली आहे.

Cerelac: मुलांना सेरेलॅक खाऊ घालणे धोकादायक? तपासात धक्कादायक माहिती उघड, कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी

मुंबईतील एका डॉक्टरला आईस्क्रीम खाताना मानवी बोट सापडले होते. यानंतर या डॉक्टर तरूणाने मलाड पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आइस्क्रीम ब्रँड यम्मोविरुद्ध एफआयआर नोंदवत गुन्हा दाखल केला होता. आता या घटनेचे गाझियाबाद कनेक्शन समोर आले आहे.

२६ वर्षीय ब्रँडन फेराओने तक्रारीत सांगितले आहे की, त्याने आपल्या बहिणीसोबत ॲपद्वारे आईस्क्रीम ऑर्डर केली होती. त्याने तीन यम्मो मँगो फ्लेवरची आईस्क्रीम ऑर्डर केली. काही वेळाने त्याला डिलिव्हरी मिळाली आणि त्यात दोन आंब्याचे फ्लेवर आणि एक बटरस्कॉच होता. दुपारच्या जेवणानंतर जेव्हा त्याने बटरस्कॉच आइस्क्रीम खायला सुरुवात केली तेव्हा त्याला त्यात काहीतरी विचित्र दिसले. त्याने निरखून पहिले असता आइस क्रीममध्ये मानवी बोट असल्याचे आढळले.

दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस; माझगाव, भुलेश्वर, तारदेव आणि मुंबई सेंट्रल येथील वीजपुरवठा खंडित!

फेराओने माध्यमांना सांगितले की, त्याने इंस्टाग्रामवर युम्मो आइस्क्रीमची तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे कस्टमर केअरने सांगितले. यानंतर त्याने बोट आणि आईस्क्रीमचे पॅक घेऊन मालाड पोलीस ठाणे गाठले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आइस्क्रीम रॅपरवर उत्पादनाची तारीख ११ मे २०२४ आहे तर एक्सपायरी डेट १० मे २०२५ आहे. लक्ष्मी आईस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेड, गाझियाबाद यांनी हे उत्पादन तयार केले आहे.

Nagpur News : नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरणाला नवा टर्न! बड्या काँग्रेस नेत्याचं नाव आलं समोर

कंपनीने केला खुलासा 

यम्मोच्या माध्यम प्रतिनिधींनी सांगितले की, 'आम्ही थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग सुविधेतून उत्पादन थांबवले आहे. आम्ही तिथे बनवलेले सर पदार्थ वेगळे केले आहेत. हे गोदाम व बाजारात गेलेल्या उत्पादन स्तरावर देखील केले गेले आहे. या प्रकरणाच्या तपासात आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आढळलेल्या बोटाचा तुकडा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आइस्क्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसी कलम २७२ (विक्रीसाठी अन्न किंवा पेयेची भेसळ), २७३ (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) आणि ३३६ (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे) नोंदवले आहे. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर