मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Atal Setu Bridge : प्रवाशांना अटल सेतूची भुरळ! चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहतूक सुरू

Atal Setu Bridge : प्रवाशांना अटल सेतूची भुरळ! चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहतूक सुरू

Jan 14, 2024 11:30 AM IST

Atal Setu Bridge : देशातील सर्वाधिक मोठा सागरी मार्ग असणाऱ्या अटल सागरी सेतुवरुन जाण्यास प्रवाशांनी पसंती दिली आहे. दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत.

Mumbai Trans Harbour Link Bridge
Mumbai Trans Harbour Link Bridge

Atal Setu Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या शिवडी न्हावा शेवा(अटलसेतू)चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या नंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारपासून या मार्गाने जाण्यास प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे. चिर्ले मार्गाने पनवेल आणि पुणे परिसरातून येणाऱ्या वाहने या मार्गाने जाण्यास पसंती देत आहेत.

Milind Deora News : मोठी बातमी! मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला! आज शिंदे गटात करणार प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब व जगातील १० व्या क्रमाकांच्या लांबीच्या सागरी मार्गाचे लोकार्पण केले. समुद्रावर बनवलेला हा देशातील सर्वात लांब पूल आहे. हा पूल दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत पोहचण्यासाठी केवळ २० मिनिटांचा वेळ घेईल. यापूर्वी हे अंतर दोन तासांचे होते. अटल सेतु जवळपास २१.८ किलोमीटर लांबीचा व सहा पदरी समुद्री पूल आहे. याची लांबी समुद्रात साडे १६ किलोमीटर तर जमिनीवर ५ किलोमीटर आहे. या पुलासाठी १७,८४० कोटीहून अधिक खर्च झाला आहे.

Navi Mumbai builder murder : धक्कादायक! नवी मुंबई सीवूड्स भागात बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या

सध्या हा पूल वाहनचलकांना भुरळ घालत आहे. देशातील सर्वाधिक मोठा असलेला हा पूल पाहण्यासाठी नागरीक या मार्गाने प्रवास करण्याला पसंती देत आहेत. प्रामुख्याने चिर्ले मार्गाने पनवेल आणि पुणे परिसरातून येणारे प्रवासी या मार्गाने जात आहेत. तर उरणच्या बाजूने मुंबईकडे जाणारी वाहन संख्या मोजकी आहे. उरणच्या दिशेची एकच मार्गिका सध्या खुली करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काळात या मार्गाने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अटल सेतु संदर्भात बोलायचे झाल्यास हा पूल अनेक वैशिष्यांनी युक्त आहे. हा सेतु बांधण्यासाठी आयफेल टॉवरच्या तुलनेत १७ पट अधिक स्टील वापरले गेले आहे. कोलकाताच्या हावडा ब्रीजहून चार पट अधिक स्टील लागले आहे. या सागरी सेतूसाठी जे काँक्रिट लागले आहे, ते अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून सहा पट अधिक आहे. अटल सेतु इतका मजबूत आहे की, भूकंप, सुनामी व वादळी वाऱ्यांचा यावर काहीच परिणाम होणार नाही.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर