पुणे : पुण्यातील लोणावळा येथील पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. येथील लोहगड हे त्यातील आवडते ठिकाण आहे. रविवारी सुट्टी असल्याने हजारो पर्यटक किल्यावर पर्यटणासाठी आल्याने मोठा गोंधळ उडाला. गडावर पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसल्याने गोंधळ उडाला. गडावर चेंगरा-चेंगरी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल चार तास गडावर गोंधळाचे वातावरण होते. येथील गोंधळाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये घाटमाथ्यावर मोठा पाऊस सुरू आहे. यामुळे येथील निसर्ग सौंदर्य खुलले असून हे सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यंटक या ठिकाणी येत आहेत. पुणे, पिंपरीचिंचवड तसेच मुंबई येथील नागरिक या ठिकाणी आल्याने गडावर तोबा गर्दी झाली होती. येथील खंडाळा, लोहगड, भाजे या ठिकाणी देखील पर्यटकांची गर्दी उसळली होती. सर्वाधिक पर्यटक हे गडावर आल्याने येथे तब्बल चार तास पर्यटकांना अडकून बसावे लागले.
अखेर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत यातून मार्ग काढत पर्यटक गडाच्या खाली उतरले. यामुळे गडावर मोठी दुर्घटना होता होता टळली. दरम्यान, या घटनेमुळे या ठिकाणी नियोजन तसेच समन्वय असल्याचा अभाव प्रकर्षाने जाणवला. दरम्यान, पर्यटकांनी अशा ठिकाणी जातांना काळजी घ्यावी तसेच पोलिसांनी देखील पर्यटन स्थळावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या