मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC-SSC Board Exam : दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

HSC-SSC Board Exam : दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 19, 2022 08:31 PM IST

HSC-SSC Board Exam : विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना योग्य नियोजन करता यावे यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावी (SSC) व बारावी (HSC) परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकाच्या तारखा दिवाळाआधीच जाहीर केल्या आहेत

दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई– यंदा दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (Maharashtra board exam) फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (SSC Exam) व बारावीच्या (HSC Exam) लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बोर्डाकडून आज (सोमवार) हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आज जाहीर झालेल्या संभावित वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होऊन २० मार्च २०२३ पर्यंत चालणार आहे तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ यादरम्यान होणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना योग्य नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रकाच्या तारखा दिवाळाआधीच जाहीर केल्या आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या बारावी आणि दहावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की, शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग