मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बारावीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बारावीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 18, 2023 11:49 PM IST

Leopard Attack Khed : दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अजयला दाट झाडीत ओढत नेत त्याच्यावर हल्ला केला. स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

Leopard Attack Khed Pune
Leopard Attack Khed Pune (HT)

Leopard Attack Khed Pune : चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील खेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनावरं चारण्यासाठी गेलेले असताना झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं मुलांच्या घोळक्यावर हल्ला केला. त्यात अजय चिंतामणी जठार या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अजयच्या साथीदारांनी बिबट्याच्या दिशेनं दगड भिरकावले, परंतु तरीही बिबट्या अजयवर हल्ला करत त्याला दाट झाडीत ओढत नेलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेमुळं खेड तालुक्यातील धुवोली गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय जठार हा बारावीचं शिक्षण घेत होता. चार दिवसांपूर्वीच त्याची परिक्षा संपली होती. त्यानंतर तो मित्रांसोबत जनावरं चारण्यासाठी रानात गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अजयवर अचानक हल्ला केला. त्यावेळी प्रसंगावधान राखून त्याच्या मित्रांनी बिबट्याच्या दिशेनं दगड भिरकावले. परंतु तरीदेखील बिबट्यानं अजयवर हल्ला सुरुच ठेवला. अजय आणि त्याच्या साथीदारांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी अजयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर जठार कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर आणि जुन्नर या भागांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. बिबट्याच्या भीतीमुळं शेतकऱ्यांसह नागरिक घराबाहेर पडणं टाळतात. गेल्या आठवड्यातच बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळं शिवारात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग