HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल आज, एका क्लिकवर पाहा तुमचा रिझल्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल आज, एका क्लिकवर पाहा तुमचा रिझल्ट

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल आज, एका क्लिकवर पाहा तुमचा रिझल्ट

May 21, 2024 08:13 AM IST

HSC Result Date and Time: महाराष्ट्र बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली.
महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली.

MSBSHSE 12th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचे गुण महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in. वर तपासू शकतात.

महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासण्यासाठी योग्य नोंदणी क्रमांक/ रोल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. गेल्या वर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, ज्यात एकूण ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक ७ लाख ६० हजार ०४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर, कला आणि वाणिज्य शाखेतून अनुक्रमे ३ लाख ८१ हजार ९८२ आणि ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेत, कोकण जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के होते.

येथे पाहा निकाल

- सर्वप्रथम mahresult.nic.in एमएएच निकालाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

- होम पेजवर उपलब्ध महाराष्ट्र एसएससी निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.

- पुढे हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.

- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

- निकाल तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट डाउनलोड करा.

२०२३ मध्ये महाराष्ट्र एसएससीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४९ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकालाची टक्केवारी ९३.८३ टक्के होती.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर