चार तासांची नोकरी आणि ११,००० रुपये पगार; मुली व महिलांसाठी चंद्रकांत पाटील यांची घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चार तासांची नोकरी आणि ११,००० रुपये पगार; मुली व महिलांसाठी चंद्रकांत पाटील यांची घोषणा

चार तासांची नोकरी आणि ११,००० रुपये पगार; मुली व महिलांसाठी चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Published Oct 12, 2024 07:57 AM IST

chandrakant patil : येत्या १ नोव्हेंबरपासून मुली व महिलांना चार तासांची पार्ट टाइम नोकरी दिली जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

चार तासांची नोकरी आणि ११,००० रुपये पगार; बारावी पास मुली व महिलांसाठी चंद्रकांत पाटील यांची घोषणा
चार तासांची नोकरी आणि ११,००० रुपये पगार; बारावी पास मुली व महिलांसाठी चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Chandrakant Patil on part time jobs : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची राज्यात सर्वत्र चर्चा सुरू असताना आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुली व महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या नोव्हेंबरपासून १ हजार महिलांना पार्ट टाइम नोकरी दिली जाईल, असं पाटील यांनी सांगितलं.

नवमीचा मुहूर्त साधून चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या कोथरूड मतदारसंघात कन्या पूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला व मुली उपस्थित होत्या. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसंच, अर्धवेळ नोकऱ्या देणार असल्याचीही घोषणा केली. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

महिलांना अनेक हातांनी राबत असतात. कुटुंबात त्यांना पती, मुलं आणि सासू-सासरे या सगळ्यांचंच आवरायचं असतं. त्यातून त्या मोकळ्या झाल्या तरी काही ना काही करायला सज्ज असतात. अशा महिलांना व मुलींना ४ तासांचे पार्ट टाइम जॉब मिळाले पाहिजेत, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. ती येत्या १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

'एका मोठ्या कंपनीनं माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर १ हजार मुलींना व महिलांना ४ तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवली आहे. या जॉबसाठी त्यांना ११ हजार रुपये पगार मिळेल. एक वेळचा नाष्टा आणि एक वेळचं जेवण मोफत मिळेल. तसंच, कामाच्या ठिकाणी येण्याजाण्याचीही मोफत सोय केली जाईल. यातील दोन नोकऱ्यांची पत्रं मी उद्याच देणार आहे, असंही पाटील यांनी जाहीर केलं.

लवकरच या संदर्भातील अधिकृत जाहिरात काढली जाईल. १२ वी पास असलेल्या मुलींकडून अर्ज मागवले जातील. कंपनी आणि आम्ही स्वत: या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेऊ. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून त्यांना प्रत्यक्षात काम करता येईल, असं त्यांनी सांगितलं. महिलांना स्वत:च्या पायावर मजबुतीनं उभं करण्याचा उद्देश यामागे आहे, असं पाटील म्हणाले.

लाठी-काठी शिकलेल्या मुलींना १० हजार रुपये मानधन

लाठी-काठी शिकलेल्या १०० मुलींना दर महिन्याला १० हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. हे १० हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीनं दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावी. पुढच्या नवरात्रीपर्यंत ५० हजार मुलींना लाठीकाठी प्रशिक्षण देण्याचं माझं लक्ष्य आहे, असं ते म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर