ऑल द बेस्ट! बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; १५, ०५, ०३७ विद्यार्थी अन् 'कॉपीमुक्ती'साठी २७१ भरारी पथके
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ऑल द बेस्ट! बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; १५, ०५, ०३७ विद्यार्थी अन् 'कॉपीमुक्ती'साठी २७१ भरारी पथके

ऑल द बेस्ट! बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; १५, ०५, ०३७ विद्यार्थी अन् 'कॉपीमुक्ती'साठी २७१ भरारी पथके

Updated Feb 10, 2025 08:33 PM IST

HSC Exam 2025 : राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांत एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत.

बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून
बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून

HSC Board Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा उद्यापासून (११ फेब्रुवारी) सुरु होत आहे. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधित बारावी बोर्ड परीक्षा होणार आहे. राज्यात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या या परीक्षेत यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. तसेच ३७ तृतीयपंथी परीक्षा देत आहेत. राज्यातील ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

९ विभागीय मंडळांत ३३७६ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन -

राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. ३३७३ मुख्य परीक्षा केंद्रे आणि  ३३७६  उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. यंदा विज्ञान शाखेला ६८ हजार ९६७  विद्यार्थी,  कला शाखेला ३ लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमाला ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४  हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. 

राज्यात २७१ भरारी पथके -

बोर्डाच्या परीक्षा काळात कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत. राज्यातील ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील. त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळांनी अर्ध शासकीय पत्राद्वारे आव्हान केलेले आहेत.

विशेष सुविधा - 

जे विद्यार्थी वैद्यकीय, व्यापारिक किंवा तत्सम कारणांमुळे नियोजित तोंडी, प्रकल्प किंवा अन्य परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी १२, १५ आणि १७ मार्च रोजी ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा आयोजित केली जाईल.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर