Maharashtra Board Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! परीक्षेला १० मिनिटे जास्त मिळणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Board Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! परीक्षेला १० मिनिटे जास्त मिळणार

Maharashtra Board Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! परीक्षेला १० मिनिटे जास्त मिळणार

Jan 24, 2024 03:47 PM IST

Maharashtra SSC HSC Board Exam News : १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बोर्डाच्या परीक्षा पुढील महिन्यात सुरू होणार असून यात निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे जास्त देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Board Exam
Maharashtra Board Exam

Maharashtra Board Exam : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात १२ वीच्या तर मार्च महिन्यात १० वीच्या परीक्षा होणार आहे. या परिक्षांच्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे अधिक वेळ मुलांना पेपर सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. यामुळे मुलांना फायदा होणार आहे. या पूर्वी परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तसेच परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी केल्या जात होते.

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूक लढणार, इंडिया आघाडीला धक्का

दहावी आणि १२ वीच्या परिक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षेची जोरदार तयारी मुले करत आहेत. बारावीची लेखी परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान, होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते 26 मार्च या कालवधीत होणार आहे. या दोन्ही परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मुलांसह पालकांची देखील परीक्षा असते. मुलांना उत्तर पत्रिका वाचता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते.

मात्र, पेपर फुटीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी व परीक्षा योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची पद्धत गेल्या वर्षीपासून रद्द करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका वाचून प्रत्यक्ष उत्तरे लिहिण्यासाठी उशीर लागत होता. त्यामुळे त्यांना वेळ कमी पडत होता. यामुळे मुलांना वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर मुलांना आणखी १० मिनिटे वाढीव वेळ दिला जाणार आहे. यामुळे त्यांना परीक्षा योग्य पद्धतीने देता येणार आहे.

Republic Day Parade 2024: प्रजासत्ताक दिवस का साजरा केला जातो? कर्तव्यपंथावर का केले जाते संचलन ? वाचा रंजक इतिहास

या परीक्षा या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ वाजता पेपर सुरू होणार असल्याने मुलांना १०.३० वाजता दालनात हजर राहावे लागणार आहे. तर दुपारी ३ वाजता पेपर सुरू होणार असल्याने २.३० वाजता वर्गात येवून मुलांना बसावे लागणार आहे.

सकाळच्या सत्रातील पेपर लिखाणाला ११ वाजता सुरुवात होणार आहे. हा पेपर २ पर्यंत सोडवावा लागणार आहे. यानंतर मुलांना २.१० असा वाढीव १० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. तर दुपारी ३ वाजता पेपर लिखाणाला सुरुवात होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर