मुंबईतील एका खाजगी कंपनीतील ह्यूमन रिसोर्स मॅनेजर विरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या दिवंगत वडिलांच्या PF म्हणजे प्रॉव्हीडेंट फंडातील रक्कम देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली. पोलिसांनी आरोपी मॅनेजरच्या विरोधात केस दाखल केली असून चौकशी सुरू आहे. दरम्यान अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
काय आहे घटना -
२३ वर्षीय महिला वांद्रे (पूर्व) येथील राहणारी आहे. ती दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांड्याचे काम करून आपला लहान भाऊ व आजीसह राहते. तिचे आई-वडील विभक्त झाले होते. २०१५ मध्ये महिलेच्या वडिलाचे निधन झाले आहे. तेव्हा महिलेचे वय केवळ १५ वर्ष होते. महिलेचे वडिल ज्या कंपनीत काम करत होते, तेथे त्यांचा PF कट होत होता. ती रक्कम मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर मिळणार होती.
Maharashtra Politics : ...तर मी कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्याने बारामतीत नवा ट्विस्ट
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रार दाखल केली आहे की, पीएफचे पैसे मिळवण्यासाठी अनेक फॉर्म जमा केल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. तेव्हा चौकशी केल्यानंतर समजले की, त्यांची फाइल कंपनीच्या मॅनेजरकडे पेंडीग आहे. तेव्हा महिलेने HR मॅनेजरशी संपर्क केला. त्यावेळी त्याने पैसे मिळवण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली.
महिलेकडे HR मॅनेजरशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंगही आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याशी संबंधित कलमांनुसार तक्रार दाखल केली आहे.
संबंधित बातम्या