ST Bus viral Video: सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडिओतून मनोरंजन होतं तर काही व्हिडिओच्या माध्यमातून समाजातील प्रश्न पुढे येत असतात. सध्या सोशल मिडियावर एसटीबसचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात बसला पायऱ्या नसल्याने बसमध्ये चढायचे कसे हा प्रश्न चालकाला पडला आहे. विशेष म्हणजे बसच्या ज्या बाजूने खिडकी आहे, त्या बाजूला पायऱ्या असल्याने एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. बस चालक मात्र, हसून यावर महातोय की तुम्हीच महामंडळाला सांगा की या बसमध्ये बसायचे कसे. या चालकाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
राज्यात महामंडळाच्या बस गाड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही बस तर अक्षरश: खिळखिळ्या झाल्या आहेत. असाच एका बसचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या बसमध्ये पायऱ्यांची रचना चुकीच्या पद्धतीने केली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे बसमध्ये चढायचं कसं? हा प्रश्न चालकाला पडला आहे. कारण पायऱ्या खिडकीवर आहेत आणि दरवाजा हा दुसऱ्या बाजूने उघडत असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.
हा व्हिडीओ pune_trending_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर महामंडळाच्या कारभाराचे वाभाडे देखील काढले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बसचालक प्रश्न विचारत असतांना दिसत आहे, हा चालक बसच्या पायऱ्या दाखवत या बसमध्ये चढायचं कसं सांगा? असा प्रश्न विचारत आहे. करण दरवाज्या पुढे ज्या खिडक्या आहेत तर त्याच्या खाली दोन पायऱ्या आहेत. मात्र, ज्या दरवाज्यातून चालक गाडीत बसतो त्या ठिकाणी पाय ठेवायला काही ही नाही. त्यामुळे ड्रायव्हरने स्वत: प्रश्न विचारत सांगा बरे या बसमध्ये चढायचं कसं? असे व्हिडिओ काढणाऱ्याला म्हटले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून तब्बल १६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संबंधित बातम्या